Pune News : मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर एकाच दिवशी 5 अपघात ! नऱ्हेजवळ 2 सख्ख्या भावांचा मृत्यू तर 8 जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नऱ्हेजवळ साखळी पद्धतीनं 5 मोठे विचित्र अपघात झाल्याचं समोर आलं. सोमवारी (दि 11 जानेवारी) पहाटे साडेचार वाजल्यापासून सकाळी साडे दहा वाजेपर्यंत ही विचित्र अपघातांची मालिका सुरूच होती. या अपघातांमध्ये दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. राजू भगवान मुजालदे (वय 32), अजय भगवान मुजालदे (वय 28, दोघंही राहणार- जि. बिडवाणी, राजस्थान) अशी मृत पावलेल्या दोघांची नावं आहेत. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं.

समोर आलेल्या माहितीनुसार, येथील तक्षशिला सोसायटीच्या पाण्याच्या टाकीपासून नऱ्हे सेल्फी पॉईंट गार्डन पर्यंत तीव्र उतारावर हे अपघात झाल्याचं समजत आहे. सतत झालेल्या या अपघातांमुळं महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. मालवाहतूक ट्रक आणि कंटेनरनं  रिक्षा, कार, बोलेरो जीप पोलीस व्हॅन, दुचाकी, ट्रक अशा तब्बल 7 ते 8 वाहनांना धडक दिली. इतकंच नाही तर दोन ठिकणी ट्रक पलटी झाले. यामुळं कात्रज नवीन बोगद्याच्या पलीकडे शिंदे वाडीपर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. तसंच नऱ्हे आंबेगाव परिसरातही मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं.

मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सेल्फी पॉईंटजवळ रस्त्यावर एक ट्रक उभा होता. नवीन कात्रज बोगद्याच्या बाजूकडून भरधाव वेगात येणाऱ्या दुसऱ्या ट्रकनं त्याला जोरदार धडक दिली. सोमवारी (दि.11) पहाटे चार वाजताच्या सुमार ही घटना घडली. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस आणि अग्निमशमन दलाच्या जवानांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं अशी माहिती पोलिसांनी दिली.

भूमकर ब्रीजजवळ अपघातग्रसत वाहने बाजूला घेत असताना पुढे चाललेल्या ट्रकला पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पोनं धडक दिली. या टेम्पोतील 2 जण जखमी झाले. भूमकर ब्रीज जवळ किशोर भूमकर यांच्या गॅरेजसमोर पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. तिसरा अपघात हा 9 वाजताच्या सुमारास झाला. या अपघाताच्या जवळच कंटेनरनं कारला घासून तिचं नुकसान केलं.

भूमकर ब्रीजवूरून कागदी गठ्ठे घेऊन जाणारा एक ट्रक पलटी झाला आणि सर्व्हीस रोडवर भूमकर चौकात कोसळला. अशा प्रकारे झालेल्या चौथ्या अपघातात एक व्यक्ती जखमी झाली. ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांची एक चारचाकी गाडी महामार्गावरून निघाली होती. यावेळी एका ट्रकनं पोलिसांची बोलेरो गाडी आणि एका रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले. अवघ्या चार तासात 5 अपघात झाल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिली.

मयत व्यक्ती : दोन
1) राजू भगवान मुजालदे वय 32 वर्ष रा मु पो बकवाडी ता राजापूर जि बडवाणी रा मध्य प्रदेश
2) अजय राजू भगवान मुजालदे वय 28 वर्ष रा मु पो बकवाडी ता राजापूर जि बडवाणी रा. मध्य प्रदेश

जखमी व्यक्ती : आठ
1) गणेश कैलास भाडोले व 30 वर्षे चालक रा मध्य प्रदेश
2) राजेंद्र उत्तम जाधव वय 32 वर्षे धंदा रिक्षा चालक आगासवाडी ता मान सातारा
3) सोनाली राजेंद्र जाधव वय 25 वर्ष
4) यश जाधव 11 महिने
5) कृष्णा रामचंद्र कदम वय 52 वर्ष सहायक पोलिस उपनिरीक्षक, पुणे ग्रामीण
6) मंजुनाथ मारुती जळलेगकर वय 45 वर्ष रा पाटील हेरिटेज दत्तनगर आंबेगाव
7) विशाल हनुमंत हनुमकर ( वय 23, बेळगांव)
8) मकतूम पकडू इंदालाग (वय 23, बेळगांव)