Pune News | पुण्यात पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलिसांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई, पोलीस दलात खळबळ

पुणे (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन पुणे पोलीस (Pune Police) दलातील एका पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर (Upper Commissioner of Police Dr. Jalindar Supekar) यांनी केली आहे. यामुळे पुणे पोलीस (Pune Police) दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. Pune News | 5 police suspended in pune city including one police sub inspector

पोलीस उपनिरीक्षक सचिन प्रल्हाद निंबाळकर (Sub-Inspector of Police Sachin Pralhad Nimbalkar), पोलीस हवालदार बाळू रामचंद्र मुरकुटे (Constable Balu Ramchandra Murkute), पोलीस कर्मचारी शरद नाथा मोकते(Police personnel Sharad Natha Mokte), महावीर सामसे (Mahavir Samse) आणि किशोर चंद्रकांत नेवसे (Kishore Chandrakant Nevese) ( सर्व कोर्ट कंपनी, मुख्यालय शिवाजीनगर, पुणे) अशी निलंबित करण्यात आल्यांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, येरवडा जेल (Yerawada Jail) मधील बंदी वेद प्रकाशसिंग वीरेंद्रकुमार सिंग यांच्या मुलीचे लग्न असल्याने त्याला त्याच्या मूळगावी उत्तरप्रदेशमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली होती. निलंबित पोलिसांवर त्याला तेथे नेऊन परत आणण्याची जबाबदारी होती. पोलिसांना 10 मे 2021 रोजी आरोपी पार्टी देण्यात आली होती. पोलीस त्याला घेऊन उत्तरप्रदेशमध्ये त्याच्या गावी पोहोचले. 15 मे 2021 रोजी बंदी वेदप्रकाशसिंग याने पहाटे 5 ते 6 दरम्यान त्याच्या घराच्या खिडकीचे गज कापून पलायन केले. पोलिसांनी त्याच्या कामात हलगर्जीपणा केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

Wab Title :- Pune News | 5 police suspended in pune city including one police sub inspector

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

MP Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले – ‘खासदारकी मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो’

Vaccination Scam | मुंबईतील हाऊसिंग सोसायटीत बोगस लसीकरण; 390 जणांकडून घेतले प्रत्येकी 1260 रुपये

DSK Builder Case | 32 हजार ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक ! बिल्डर डीएसकेंचा मुलगा शिरीष कुलकर्णींचा जामीनासाठी अर्ज