Pune News | पुणे जिल्ह्यातील 56 हजार प्रकरणे ठेवली जाणार तडजोडीसाठी; 1 ऑगस्टला होणार्‍या लोकअदालतून निघणार निकाली

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  कोरोनामुळे लांबलेले प्रकरण त्वरीत निकाली काढण्यासाठी पक्षकारांना लोकअदालतीच्या (lok adalat) निमित्ताने यंदा पहिल्यांच संधी मिळणार आहे. तडजोडीस पात्र दावे चर्चेतून निकाली निघावे म्हणून 1 ऑगस्ट रोजी लोकअदालतीचे आयोजन (Pune News) करण्यात आले आहे. दाखल आणि दाखल पूर्व असे जिल्ह्यातील ५६ हजार दावे लोकअदालतीमध्ये ठेवण्यात (Pune News) येणार आहे.

या वर्षांची ही पहिलीच लोकअदालत आहे. दावे निकाली काढण्यासाठी प्रमुख न्यायाधीशपदी एस. ए. देशमुख (Chief Justice S. A. Deshmukh) यांच्या मार्गदर्शनानुसार 45 पॅनेल तयार करण्यात आले आहेत. त्यात न्यायाधीश, वकील, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रताप सावंत (District Legal Services Authority Secretary Pratap Sawant) यांनी मंगळवारी दिली. तडजोडयोग्य दावे, दाखलपूर्व दावे सामंजस्याने निकाली काढण्यासाठी लोकअदालतीपुढे ठेवण्यात येतात. भूसंपादन, धनादेश न वटणे, कौटुंबिक, मोटार अपघाताचे न्यायप्राधिकरण, दिवाणी आणि तडजोड योग्य फौजदारी प्रकरणे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. लोकअदालतीचे कामकाज पाहण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पॅनेलसमोर हा दावा ठेवण्यात येतो.

 

खासगी कंपनीची मदत :

 

पक्षकारांना जलद न्याय मिळण्याबरोबर दाव्यासाठी खर्च होणारा पैसा आणि वेळ वाचण्यास मदत होते. न्यायालयातील गर्दी टाळण्यासाठी प्रत्यक्षसह व ऑनलाइन देखील कामकाज होणार आहे.
न्यायालयात येणे ज्यांना शक्य नसेल असे पक्षकार ऑनलाइन सहभाग घेवू शकता.
त्याबाबत पक्षकारांना मदत करण्यासाठी राज्य प्राधिकरणाने सामा या कंपनीची मदत घेतली आहे.

संकट काळात जवळच माणूस किती महत्त्वाचा असतो हे नागरिकांना समजले आहे.
त्यामुळे वाद दूर ठेवून वाद मिटवण्याची भावना वाढली आहे.
लोकअदालतीत वाद मिटला तर जय-विजयाची भावना राहात नाही. तसेच वाचलेला वेळ आणि खर्च कुटुंबासाठी वापरता येईल.

प्रताप सावंत, सचिव, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (District Legal Services Authority Secretary Pratap Sawant)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्यात 400 गुंतवणूकदारांची 16 कोटींची फसवणूक ! महेश लोहिया, सुनील सोमाणी, गजानन मानेनंतर चार्टर्ड अकाऊंटंट (CA) कैलास मुंदडाला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

Gold Price Today | सोन्याच्या दरात 123 रुपयांची ‘घसरण’, चांदी झाली 206 रुपये ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर 

Modi Government | अधिकार्‍यांच्या कामाचा आढावा घेणार मोदी सरकार, 50 वर्षांवरील अकार्यक्षम ऑफिसरला करणार सेवानिवृत्त !