Pune News | पुण्यातील 80 शिवभोजन केंद्रचालक 3 महिन्यांपासून अनुदानापासून ‘वंचित’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पुणे, पिंपरी चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील ८० शिवभोजन थाळी केंद्र चालकांना गेल्या तीन महिन्यांपासून केंद्र चालविण्याचे अनुदान मिळालेले नाही. राज्य सरकारकडून (State Government) जिल्हा प्रशासनाकडे या केंद्रचालकांना देण्याचा निधी वर्ग करण्यात आला आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने केवळ आहार वितरण अधिकाऱ्याची नेमणूक केलेली नाही. या अधिकाऱ्याची स्वाक्षरी झाल्याशिवाय केंद्रचालकांना कोषागारातून निधी वितरित करण्यात येत नाही. या तांत्रिक बाबीमुळे पुण्यातील ८० शिवभोजन केंद्रचालक गेल्या तीन महिन्यांपासून अनुदानापासून वंचित राहिले आहेत. (Pune News)

 

महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) राज्यात शिवभोजन थाळी केंद्रांची सुरुवात केली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पुढाकारातून राज्यभर ही योजना सुरू करण्यात आली. गरजू, गरीब नागरिकांना खिशाला परवडेल या दरात पोटभर जेवण मिळावे आणि या योजनेतून रोजगार निर्माण व्हावा हा उद्देश होता. पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही या योजनेला सुरूवातीपासूनच उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या दहा रुपयांत या केंद्रांमध्ये पोटभर जेवण मिळत आहे. या केंद्रांना एका थाळीमागे ठराविक रक्कम सरकारकडून अनुदान म्हणून देण्यात येते. (Pune News)

 

राज्याच्या अन्न नागरी पुरवठा विभागातील पदांचा नव्याने आकृतीबंध करण्यात आला. त्यानुसार पुणे जिल्ह्याच्या अन्नधान्य वितरण कार्यालयात कार्यरत ५७ कर्मचाऱ्यांना पुन्हा महसूल विभागातील मूळ जागेवर पाठविण्यात आले आहे. त्यामध्ये लिपिक, कारकूनसह तीन तहसीलदार, एक नायब तहसिलदार असा कर्मचारी वर्गाचा समावेश आहे. परिणामी या विभागाचे काम रखडण्यास सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांनी तात्पुरत्या स्वरुपात अन्य विभागातील काही कर्मचाऱ्यांना अन्नधान्य वितरण कार्यालयात वर्ग करण्याचे नियोजन केले आहे.

पुणे शहरात ४१ आणि जिल्ह्यात ४१ असे एकूण पुणे जिल्ह्यात ८२ शिवभोजन थाळी केंद्रे कार्यरत आहेत. त्या केंद्रांना एका थाळीमागे शहरात २५ आणि ग्रामीण भागात ३५ रुपये अनुदान देण्यात येते. तर ग्राहकांकडून केंद्र चालकांना दहा रुपये देण्यात येतात. शिवभोजन थाळी केंद्रांना अनुदान वितरण करण्यासाठी अन्नधान्य वितरण कार्यालयातील एक तहसिलदार पदावरील आहार वितरण अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येते. या अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीनंतर कोषागारातून निधी वितरीत करण्यात येतो. केवळ या पदावरील अधिकारी अद्याप कार्यरत नसल्याने निधी वितरीत करण्यात आला नाही. जिल्ह्यातील केंद्रांना एका महिन्यासाठी ३५ ते ४० लाख रुपयांचा निधी लागतो. मे महिन्यानंतर आतापर्यंतचा निधी तांत्रिक अडथळ्यामुळे वितरीत होऊ शकला नाही.

 

लवकरच निधी देण्याचे प्रशासनाचे आश्वासन
जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्रांचा निधी वितरण करण्याचे राहिले आहे ही वस्तुस्थिती आहे.
केंद्रासाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे. मात्र, कर्मचाऱी अधिकाऱ्याची अद्याप काही पदे रिक्त आहेत.
त्या तांत्रिक कारणास्तव हा निधी वितरीत करायचा राहिला आहे, याला जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी दुजोरा दिला.
हा निधी लवकरच वितरीत करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 

Web Title :- Pune News | 80 Shiv Bhojan Kendrachalaks in Pune ‘deprived’ of subsidy for 3 months

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | नऱ्हेतील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा; 2 कामगारांवर कुऱ्हाडीने वार करुन रोकड लुटली

 

Maharashtra Political Crisis | राज्यातील सत्तासंघर्ष आता 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे, ‘या’ मुद्यावर होणार निर्णय

 

Early Puberty Signs | तुमचा मुलगा किंवा मुलगी अकाली तरुण होत आहेत का? ‘ही’ लक्षणे दिसताच पालकांनी व्हावे सतर्क