Pune News | पुण्यात बेकायदेशीररित्या 830 प्रकरणांची दस्तनोंदणी; 2 अधिकारी तडकाफडकी निलंबीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे (Pune News) शहरात 24 हून अधिक दुय्यम निबंधक कार्यालय आहेत. या कार्यालयांमध्ये दस्त नोंदणी योग्यरीत्या पार पाडली जाते किंवा नाही याची पाहणी राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली त्यावेळी, हवेली 14 (भोसरी) (pune news) दस्त नोंदणी कार्यालयात बेकायदेशीर 830 दस्तांची नोंदणी केल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, या प्रकरणी दोन अधिकार्‍यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे.

‘महारेरा’चा नोंदणी क्रमांक नसलेले 195 तर तुकडाबंदीचे आदेश मोडून 635 अशा 830 दस्तांची नोंदणी केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणी हवेली 14 (भोसरी) दस्त नोंदणी कार्यालयातील दुय्यम निबंधक आणि सह दुय्यम निबंधक यांना निलंबित करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत एका प्रकरणात वर्गीकरण चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे सरकारचे 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे ही आढळून आले आहे. एकाच कार्यालयात एवढ्या मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन करून दस्त नोंदणी केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली असून ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

2016 मध्ये राज्य सरकारने महारेराची स्थापना केली. 500 चौरस मीटरच्या आतील अथवा आठ सदनिकांच्या आतील प्रकल्पांना तरतुदीनुसार महारेराच्या प्रमाणपत्र नोंदणीतून वगळले आहे. परंतु त्यावरील प्रकल्पाला महारेराकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. अशा प्रकल्पातील सदनिकांची विक्री करताना महारेराच्या नोंदणी क्रमांकाचे प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे.

असे असतानाही हवेली 14 दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दुय्यम निबंधकांनी जाणीवपूर्वक नियमांकडे दुर्लक्ष करून 195 दस्तांची नोंदणी केल्याचे समोर आले आहे. 10 गुंठ्यांच्या आतील 635 दस्तांची नोंदणी केली आहे त्यामुळे तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी या कार्यालयातील दुय्यम निबंधक एल. ए. भोसले (L. A. Bhosle) यांना निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत.

या संदर्भात बोलताना नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर (Shravan Hardikar) म्हणाले, दुय्यम निबंधकाला महारेरा आणि तुकडाबंदी संदर्भातील आदेशाचे उल्लंघन करून दस्त नोंदणी केल्याप्रकरणी निलंबित केले आहे, तर खासगी व्यक्तीच्या माध्यमातून दस्तनोंदणीचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आल्यामुळे तेथील दुय्यम निबंधकालाही निलंबित केले.

खासगी व्यक्तींच्या हातात कारभार
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हवेली 22 (एरंडवणा) या कार्यालयालाही भेट दिली.
तपासणीत या कार्यालयात अनेक धक्कादायक प्रकार आढळून आले आहेत.
तपासणीवेळी दुय्यम निबंधक कार्यालयात वेळेवर हजर न होणे,
कार्यालयात खासगी व्यक्तींच्या हातात कारभार देणे,
दस्तनोंदणी सुरू करण्यासाठीचा ओटीपी खासगी व्यक्तीला देणे,
दस्तांचे स्कॅनिंग न करणे असे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे सह दुय्यम निबंधक ए. के. नंदकर (A. K. Nandkar) यांना देखील नोंदणी महानिरीक्षकांनी निलंबित करण्याचे आदेश दिले आहे.

Web Title :- pune news | 830 cases of illegal registration registered in pune two officers suspended revenue department

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corporation | 23 गावांच्या विकास आराखड्यावर शहरातील लोकप्रतिनिधींनी सूचना कराव्यात – उपमुख्यमंत्री अजित पवार

Pune Crime | पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये चोरी, चोरट्यांचा लाखो रुपयांवर डल्ला

Pavana Dam | पवना धरणातून 3,500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा