Pune News | पुण्यातील आजी आता 75 वर्षानंतर जाणार पाकिस्तानातील आपल्या घरी…हृदयाच्या कोपर्‍यात नेहमी होते रावळपिंडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | मे 1947 मध्ये, 15 वर्षांच्या रिना वर्माने जातीय दंगलीच्या भीतीने रावळपिंडीच्या प्रेम गल्लीतील आपले घर सोडले. त्यानंतर ती आणि तिची भावंडे हिमाचल प्रदेशातील सोलनला रवाना झाली, जिथे ते अनेकदा उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी जात. पुढे तिची आईही त्यांच्यापर्यंत पोहचली. परिस्थिती शांत होताच ते घरी परततील अशी त्यांना खात्री होती पण तसे होऊ शकले नाही. (Pune News)

 

75 वर्षांनंतर पुन्हा तो मे आला आहे. आता रिना वयाच्या नव्वदीच्या उंबरठ्यावर आहे. त्वचेच्या सुरकुत्या लोंबकळत आहेत पण पुन्हा घर पाहिल्याच्या आनंदाने तिचा चेहरा उजळून निघाला आहे. रावळपिंडीचे घर पाहण्याची रिनाची इच्छा आता पूर्ण होणार आहे. ते घर जे फाळणीपूर्वीच्या भारतात त्यांच्या वडिलांनी स्वतःच्या पैशाने बांधले आहे. (Pune News)

 

सज्जाद भाईंनी पाठवली घराची छायाचित्रे
रिना उर्फ तोषी (रावळपिंडीतील तिचे शेजारी तिला तोषी म्हणत) त्यांचे घर कसे शोधू शकल्या याची कथा देखील खूप मनोरंजक आहे. दोन वर्षांपूर्वी जेव्हा कोरोना महामारी सुरू झाली तेव्हा त्यांनी आपल्या घराच्या बालपणीच्या आठवणी आणि ते पाहण्याची इच्छा फेसबुक पोस्टद्वारे शेअर केली. पुण्याच्या या आजींच्या कथेने रावळपिंडीतील सज्जाद भाईंचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी रिना आजींचे घर शोधून काढले आणि घराचे फोटो आणि व्हिडिओही पाठवले.

रिना आजींना 90 दिवसांचा व्हिसा जारी
गुडगाव येथे राहणार्‍या रिना यांची मुलगी सोनाली हिने त्यांना गेल्या वर्षी व्हिसासाठी अर्ज करण्यास मदत केली पण अर्ज फेटाळण्यात आला. निराश न होता रिना यांनी पाकिस्तानी पत्रकाराच्या सांगण्यावरून हा व्हिडिओ बनवला. त्यानंतर हा व्हिडिओ पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हीना रब्बानी खार यांच्या निदर्शनास आला. नुकताच रिना आजींना 90 दिवसांचा व्हिसा देण्यात आला.

 

रावळपिंडीतील त्यांच्या घरला भेट देता येणार असल्याने रिना आजी खुप आनंदी आहेत. त्या म्हणतात, आता आमच्या घरात कोण राहात आहे हे मला माहीत नाही पण मला आशा आहे की ते मला ते घर पाहू देतील. रिना आजी जुलैमध्ये रावळपिंडीला जाण्याचा विचार करत आहेत. तिथे त्या फेसबुकच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व लोकांना भेटणार आहेत.

 

रावळपिंडीचे रस्ते अजूनही आठवतात
रावळपिंडीतील प्रेम गल्ली हे नाव त्यांचे वडील भाई प्रेमचंद छिब्बर यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. तिथल्या आठवणी रिना आजींच्या मनात अजूनही जिवंत आहेत. रिना आजींना अजूनही शफी भाई आठवतात. दंगल उसळली तेव्हा रिना यांच्या आईला आश्रय देणारे शफी टेलर होते. रिना आजी म्हणतात, माझी आई त्यांच्या दुकानात 6 तास लपून बसली होती.

 

कोणाच्याही मनात द्वेष नाही
कोणतीही द्वेष न ठेवता, रिना आजी त्यांच्या कौटुंबिक मुस्लिम मित्रांची प्रेमाने आठवण काढतात. त्या म्हणतात, आम्ही कधीही कोणत्याही समाजाबद्दल द्वेष केला नाही. फाळणी झाली तेव्हा प्रचंड भीती आणि गोंधळ होता.

 

आमच्या रस्त्यावरच्या मुलींना सुरक्षेसाठी लष्कराच्या छावणीत लपून राहावे लागले.
त्या  पुढे म्हणतात, ही खूप त्रासदायक परिस्थिती होती पण जे मागे राहिले  प्रेम वाटते.
आजकाल लोकांच्या मनात वाढणारा द्वेष मला समजत नाही.

 

पालकांना बसला मोठा धक्का
रिना आजी त्यांच्या कुटुंबासह रावळपिंडीहून सोलन आणि नंतर अंबाला, पुणे आणि शेवटी दिल्लीला शिफ्ट झाल्या.
रिना यांच्या आई-वडिलांना या फाळणीचा सर्वाधिक फटका बसला.
त्यांची आई रावळपिंडीतील घर कधीच विसरू शकली नाही आणि नवीन घर बांधण्यासाठी वडिलांकडे कोणतीही बचत नव्हती. ते दिल्लीत भाड्याने राहिले.

 

या दशकात रिना यांच्या आयुष्यात बरेच काही घडले आहे.
त्या म्हणतात, माझ्या पतीला आयुष्याच्या शेवटच्या वर्षांत अर्धांगवायू झाला आणि मी माझा मुलगाही गमावला.

त्या नातवंडे, मुलगी सोनाली, त्यांचे पुण्यातील आयुष्य आणि सोशल मीडियावरच्या नव्या मैत्रीबद्दल बोलल्या.

या वयात एकट्याने रावळपिंडीला जायला भीती वाटत नाही का, असे विचारल्यावर रिना आजी म्हणतात,
रावळपिंडी माझ्या हृदयाच्या कोपर्‍यात नेहमीच जिवंत आहे आणि मला कोणतीही भीती नाही. शेवटी मी माझ्या घरी जात आहे.

 

Web Title :- Pune News | 90 years old grand mother living in pune to revisit her home in pakistan after 75 years

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | CM उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा देवेंद्र फडणवीसांनी घेतला खरपूस समाचार, म्हणाले …

Mumbai High Court | एखाद्याचं चुंबन (KISS) घेणे किंवा प्रेम करणे अनैसर्गिक लैंगिक गुन्हा नाही – मुंबई हायकोर्ट

Devendra Fadnavis | ‘तुझको मिर्ची लगी तो मै क्या करु?’ मुख्यमंत्र्यांच्या सभेला भाजपचे जोरदार प्रत्युत्तर