Pune News | ‘तालचक्र’ महोत्सवाच्या 9 व्या पर्वाचे 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी आयोजन; भारतातील एकमेव तालवाद्य महोत्सव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पुनीत बालन ग्रुप (Punit Balan Group) प्रस्तुत आणि बढेकर ग्रुप (Badhekar Group) यांच्या सहकार्याने, पद्मश्री पं. विजय घाटे निर्मित ‘तालचक्र’ हा भारतातील एकमेव तालवाद्य महोत्सव दि. २७ व २८ नोव्हेंबर रोजी सायं. ५:०० पासून यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे रंगणार आहे. या महोत्सवात रसिकांना हिंदुस्थानी आणि पाश्चात्य वाद्यांच्या सादरीकरणाबरोबरच गायन आणि नृत्याचा सुद्धा आनंद घेता (Pune News) येणार आहे.

 

“तालचक्र” महोत्सवाची सुरुवात शनिवार, दिनांक २७ नोव्हेंबर रोजी सायं. ५:०० पासून लोकप्रिय तालवादक निलेश परब आणि कृष्णा मुसळे यांच्या महाराष्ट्रातील लोकसंगीतावर आधारित “महाराष्ट्र Folk” या कार्यक्रमाने होणार असून सत्राच्या उत्तरार्धात पं. विजय घाटे, विद्वान सेल्वागणेश व शीतल कोलवलकर यांनी साकारलेला व मिलिंद कुलकर्णी आणि सुरंजन खंडाळकर यांच्या साथीने सादर होणारा ‘मेलोडिक रिदम’ हा कार्यक्रम सादर होणार आहे.

 

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, रविवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सायं. ५:०० पासून पं. नयन घोष यांचे चिरंजीव ईशान घोष, उ. तौफिक कुरेशी यांचे सुपुत्र शिखरनाद कुरेशी व योगेश शम्सी यांचे सुपुत्र श्रावण शम्सी या त्रयींचा तालवाद्य सहवादनाचा बहारदार कार्यक्रम पुण्यात पहिल्यांदाच रसिकांना अनुभवयाला मिळणार आहे. या कार्यक्रमाला मेहताब अली नियाझी यांच्या सितार वादनाची साथ असणार आहे.

 

 

तर दुसऱ्या सत्रामध्ये लोकप्रिय गायिका विदुषी कौशिकी चक्रवर्ती, जीनो बॅंक्स, शेल्डन डिसिल्वा,
ओजस अढिया, सारंगीवादक मुराद अली व अतुल रनिंगा यांनी एकत्रित साकारलेला
“फ्युजन २०२१” या पहिल्यांदाच सादर होत असलेल्या अनोख्या संगीत अविष्काराचा आस्वाद पुणेकरांना मिळणार आहे.
या अनुषंगाने तालचक्र कार्यक्रमात असे अनोखे अविष्कार दरवर्षी अनुभवयास मिळणार आहेत.

 

पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत आणि बढेकर ग्रुप यांच्या सहकार्याने सादर होत असलेल्या या ‘तालचक्र’ महोत्सवाचे लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी आणि पी. एन.जी. अँड सन्स हे सहप्रायोजक आहेत. कार्यक्रमाच्या प्रवेशिका यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे (Pune News) तसेच बुक माय शो वर सुद्धा उपलब्ध आहेत.

 

Web Title :- Pune News | 9th edition of ‘Talchakra’ festival on 27th and 28th November; The only percussion festival in India

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा