Pune News : पुण्यातील सदर्न कमांडमधील जवानाकडून 21 वर्षीय तरूणीवर अत्याचार, FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लष्करातील जवानाने लग्नाचे आमिष दाखवत एका 21 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी प्रसाद अनिल ननावर (वय 26) या जवानावर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 21 वर्षीय तरुणीने पोलिसांत तक्रार दिली आहे. 9 एप्रिल 2020 ते 9 मार्च 2021 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद हा पुण्यातील सदर्न कमांडमध्ये पोस्टिंगला होता. यावेळी त्याची या तरुणीशी ओळख झाली होती. ओळखीनंतर त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच त्यानंतर तिला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यानंतर फिर्यादी तरुणीच्या आई-वडिलांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. हे पैसे मिळाल्यानंतर त्याने पीडित तरुणीसोबत लग्न करण्यासाठी नकार दिला आहे. तसेच तिला टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर तरुणीने तक्रार दिली. अधिक तपास खडकी पोलिस करत आहेत.