Pune News | पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालय उद्घाटन कार्यक्रमप्रकरणी शहराध्यक्ष प्रशांत जगतापांसह 100 ते 150 जणांवर गुन्हा दाखल

पुणे (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) पक्षाच्या कार्यालय उद्घाटन कार्यक्रमात गर्दी जमवून कोरोना नियमांचा भंग (Violation of corona rules) केल्याप्रकरणी अखेर पुणे पोलिसांनी (Pune Police) शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (NCP City President Prashant Jagtap) यांच्यासह 150 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. कार्यक्रमाला गर्दी जमा झाल्याने शहरात टीकेची झोड उठली होती. Pune News | A case has been registered against 100 to 150 people, including city president Prashant Jagtap, in connection with the inauguration of NCP’s office in Pune

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

याप्रकरणी युवक अध्यक्ष महेश रमेश हांडे (Youth President Mahesh Ramesh Hande), शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (NCP City President Prashant Jagtap), प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रदीप देशमुख (State Executive Member Pradip Deshmukh), सरचिटणीस रोहन पायगुडे (General Secretary Rohan Paygude), माजी नगरसेवक निलेश निकम (Former corporator Nilesh Nikam), बाळासाहेब बोडके (Balasaheb Bodke) यांच्यासह 100 ते 150 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) पोलीस आमलदार गणेश वीर (Police Officer Ganesh Veer) यांनी तक्रार दिली आहे.

शनिवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) पक्षाच्या नवीन कार्यालय उद्घाटन कार्यक्रम होता. यादरम्यान महेश लांडे (Mahesh Lande) यांनी या कार्यक्रमाला ध्वनीक्षेपन याची परवानगी मिळावी यासाठी पोलिसांकडे अर्ज केला होता. त्या अर्जावर पुणे पोलिसांनी सर्व सूचना देऊन नियम पाळून कार्यक्रमाला परवानगी दिली होती. तसेच त्यांना नोटीस देखील बजावली होती.

मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या हस्ते पार पडलेल्या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती.
400 ते 500 जण जमा झाले होते.
तर यावेळी सोशल डिस्टसिंग (Social distance) तसेच अनेकांनी मास्क न घातल्याचे दिसून आले आहे.
यादरम्यान या कार्यक्रमाचे गर्दी झालेले फोटो सोशल मीडियासह व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र टीकेची झोड उठली होती.

दरम्यान कार्यक्रमानंतर माध्यमांनी अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांना याबाबत विचारले असता त्यांनी पोलिसांना कडक कारवाई करण्याचे सांगणार असल्याचे म्हंटले होते.
त्यानंतर आज पुणे पोलिसांनी (Pune Police) कारवाई करत आयोजक व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.
शिवाजीनगर भागात ढेंगळे पुलाजवळ हे नवीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भवन उभारले आहे.

Wab Title :-Pune News | A case has been registered against 100 to 150 people, including city president Prashant Jagtap, in connection with the inauguration of NCP’s office in Pune

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune News | ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान,स्वतः कोरडे पाषाण’; NCP च्या कार्यालय उद्घाटन कार्यक्रमावरुन अजित पवार ‘ट्रोल’

MP Sanjay Raut | ‘राष्ट्रनिष्ठा’, ‘स्वामीनिष्ठा’ यावरून संजय राऊत यांचा मोदी सरकारवर निशाणा

मिस्ड कॉल आणि WhatsApp वरून सुद्धा बुक करू शकता गॅस सिलेंडर, जाणून घ्या प्रक्रिया

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

Video : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीसाठी भारतीय आर्मीनं बनवलं ‘ढोल रॅम्प’, व्हायरल झाला व्हिडीओ

MP Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले – ‘खासदारकी मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो’

Vaccination Scam | मुंबईतील हाऊसिंग सोसायटीत बोगस लसीकरण; 390 जणांकडून घेतले प्रत्येकी 1260 रुपये

DSK Builder Case | 32 हजार ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक ! बिल्डर डीएसकेंचा मुलगा शिरीष कुलकर्णींचा जामीनासाठी अर्ज