Pune News : कोंढव्यात गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून मुलाला बेदम मारहाण

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून मुलाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. दोघांना पोलिसांनी अटक केली असून, दोघे फरार झाले आहेत.

रहान कुरेशी (वय 20) व अरबाज मलंग कुरेशी (दोघेही रा.शिवनेरी नगर, कोंढवा खुर्द) या दोघांना अटक केली आहे. तर त्यांच्या दोन साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जैद फक्रुद्दीन कोंडा (वय 18) याने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (14 फेब्रुवारी) रात्री फिर्यादी हा येथील शिवनेरीनगर गल्ली नंबर सात येथून दुचाकी घेऊन जात होता. यावेळी त्याच्या दुचाकीचा धक्का एका तरुणाला लागला. या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला बेदम मारहाण केली. तसेच कमरेचा पट्टा काढून त्याच्या लोखंडी हुकने तरुणाच्या डोक्यात मारहाण केली. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.