Pune News : भिडे पुलाजवळ मगर दिसल्याचा पोलिसांना कॉल उडाली तारांबळ, नागरिकांची तुफान गर्दी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  भिडे पुलाजवळ मगर दिसल्याचा कॉल आल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसही धावपळ आले अन पाहिले तर कचऱ्यात अडकलेली प्लास्टिकची बॉटल हालत असल्याचे आढळून आले. यानंतर पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडत माघार घेतली. पण हौशेनवसे काही काळ तिथेच थान मांडून होतो.

झालं असं, आज दुपारी दीड तासापूर्वी भिडे पुलावरून जाणाऱ्या नागरिकांना नदीपात्रात मगर असल्याचे जाणवले. आता नदीपात्रात अन मगर म्हणल्यावर नागरिकांनी तात्काळ ही माहिती पुणे पोलिसांना दिली. माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी येथे धाव घेतली. पोलीस पथक भिडे पुलावर पोहचले आणि त्यांनी मगर शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. पण मगर काही दिसेना. मग त्यांनी नागरिकांना विचारले मगर कुठे आहे, कुठे दिसली. नागरिकांनी एक ठिकाण दाखवले. पोलिसांनी बारकाईने पाहणी केल्यानंतर समजले की, कचऱ्यात प्लास्टिकची बाटली अडकली होती आणि ती हालत असताना ती मगर असल्याचे वाटले. त्यामुळे हा कॉल आला असल्याचे दिसून आले. यानंतर डेक्कन पोलीस माघारी फिरले. पण मगर आहे, या अफवेने भिडे पुलावर तुफान गर्दी केली होती. येणार जाणार चौकशी करत आणि मगर आहे, असे कळताच खाली उतरून ती पाहण्यासाठी धडपड करत. पण शेवटपर्यंत मगर काही कोणाला दिसली नाही.