Pune News : 6 जणांच्या टोळक्याने बंदुकीचा आणि तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवत लुटले, सहकारनगरमधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  दिवसा ढवळ्या लुटमरीच्या घटना शहरात घडू लागल्या असून जेष्ठ महिलेचे हात बांधून घर लुटल्याचा प्रकार तर एका पेपर विक्रेत्याची 90 हजाराची रोकड लूटल्याची घटना समोर आली असतानाच 6 जणांच्या टोळक्याने बंदुकीचा आणि तीक्ष्ण शास्त्राचा धाक दाखवत देशी दारूच्या दुकानातून 57 हजारांची रोकड काढून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शहरातील स्ट्रीट क्राईम कमी होत नसल्याचे वास्तव समोर येत आहे.

याप्रकरण नामदेव खंडू जांगटे (वय 42) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार 6 जणांवर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा-पुणे रस्त्यावर अरण्येश्वर कॉर्नर जवळ व्ही. आर. गुप्ता हे देशी दारूचे दुकान आहे. या दुकानात फिर्यादी काम करतात. दरम्यान बुधवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास ते नेहमी प्रमाणे दुकानात बसले होते. त्यावेळी अचानक सहा जणांचे टोळके दुकानात आले. त्यातील एकाकडे बंदूक अन इतरांकडे पालघन सारखे हत्यारे होती. त्यांनी फिर्यादी यांना बंदुकीचा धाक दाखवत कॅश काउंटरमधून 57 हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. त्याला फिर्यादी यांनी विरोध केला. पण एकाने लोखंडी पालघनने त्यांच्या पाठीवर वार केले आणि हे टोळके पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. अधिक तपास सहकारनगर करीत आहेत.