Pune News | पुण्यात माणुसकीचे दर्शन ! 32 वर्षानंतर घडवून आणली आई आणि मुलांची भेट

पुणे: Pune News | जगात माणुसकी जिवंत असल्याची आणखी एक घटना पुण्यातून समोर आली आहे. हिंजवडी (Hinjewadi ) येथे आय टी पार्क येथे कार्यरत असणाऱ्या पूनम विनोद शंकरन (Poonam Vinod Sankaran) यांनी तब्बल ३२ वर्षानंतर एका चुकलेल्या महिलेची तिच्या कुटुंबीयांसोबत भेट घडवून आणली आहे. या मदतीने पूनम यांचे कौतुक होत असून त्यांनी आदर्श निर्माण करणारे काम केले आहे. (Pune News)
पूनम या हिंजवडी येथील आय टी पार्क (Hinjewadi IT Park) येथे कामाला आहेत. जुनी सांगवी येथील शेवटचा बस थांबा आहे, या परिसरात गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून एक वयोवृद्ध महिला भरकटली होती. पूनम या ठिकाणाहूनच ऑफिसला जात असल्याने त्या तिला पहात होत्या. त्यांनी तिला चहा, नाश्ता पाणी आणून देत. त्यांच्या मनात त्या आजीविषयी आपुलकी निर्माण झाली. त्यांनी याबाबत आपल्या पतीला कल्पना दिली. त्यानंतर पतीने देखील पुढाकार घेत त्या.आजीला भेटण्यासाठी ते दोघेही गेले. त्यांनी आजीला खायला देत आपुलकीने विचारपूस केली. त्यावेळी आजी फक्त बेल पिंपळ या गावाचेच नाव सांगत होती. (Pune News)
हे सर्व घडल्यानंतर पुनम यांना त्यांचे मन स्वस्थ बसू देईना त्यांनी बेल पिंपळ या गावाबद्दल आपल्या मित्र मैत्रिणी, नातेवाईकाकांडे चौकशी सुरू केली. त्या चौकशी दरम्यान त्यांना बेल पिंपळ गावाविषयी माहिती मिळाली. बेल पिंपळ हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील असल्याचे समजले. यासाठी त्यांना त्या गावातील एका नागरिकाने सांगितले. पूनम यांनी त्या नागरिकांची मदत घेऊन बेल पिंपळ गावातील पोलिस पाटील संजय साठे यांच्याशी संपर्क केला आणि वृध्द महीलेबाबत माहिती दिली. तिचा फोटो त्यांना पाठवला. फोटो पाहताच पोलिस पाटलाने क्षणाचाही विलंब न करता ही महिला या गावातील असल्याचे समोर आले. त्या महिलेचा मुलगा आणि मुलगी याच गावात राहतात त्यांना तात्काळ पुण्याला पाठवतो.
वृध्द महिलेच्या नातेवाइकांचा शोध घेण्यात यश आल्याने पूनम यांच्या चेहऱ्यावर त्याचे समाधान दिसत होते. यावेळी सांगवी पोलीस स्टेशन मधील बिट मार्शल किरण खडक उमरगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शेलार यांना याबाबत पूनम यांनी माहिती दिली. त्यांनी बस थांबा परिसरात येऊन वृद्ध महिलेला पाहून गेले. वेळोवेळी सांगवी पोलीस पूनम यांना सहकार्य करीत होते. पूनम यांनी पोलीस पाटील साठे यांनी पूनम यांना फोन करून कळविले की दोघे बहीण भाऊ रुग्णवाहिका वाहन करून सांगवीकडे रवाना झाले आहेत. दोन दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान पोहचतील. सांगवीतील शेवटच्या बस थांब्यावर पूनम यांनी वृद्ध महिलेच्या मुलाची व मुलीची भेट घेऊन त्यांना त्यांच्या आईची भेट घडवून दिली. यावेळी मुलांनी तसेच आईने एकमेकांना पाहिल्यानंतरचा प्रसंग शब्दात वर्णन करणे कठीणच आहे.
शेतकरी कुटुंबात राहत असलेल्या आदिवासी समाजातील बहीण आणि भावाला तब्बल ३० वर्षांनंतर आपल्या आईची भेट घडून आली आहे. गेली तीस बत्तीस वर्षे आईचा फोटो फक्त डोळ्यासमोर होता. साक्षात आई भेटल्यामुळे आम्हा बहीण भावाच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले आहेत.
– बहीण आणि भाऊ, बेल पिंपळ नेवासा
समाजाला आपण काहीतरी देणे लागतो. हीच भावना मनात ठेऊन या भरकटलेल्या वृद्ध महिलेला तिच्या
मुलांसोबत भेट घडवून दिल्याचा आनंद काही वेगळाच आहे. प्रत्येकाने अशी भूमिका निभावली तर नक्कीच
एक आदर्शव्यक्तिमत्व समाजापुढे ठेवता येईल. याचा सार्थ अभिमानही वाटेल.
– पूनम शंकरन, प्रियदर्शनी नगर, जुनी सांगवी.
Web Title : Pune News | A glimpse of humanity in Pune! Mother and children meet after 32 years
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Bhaskar Jadhav | ‘रामदास कदम कोकणातील जोकर’, भास्कर जाधवांनी उडवली ‘त्या’ विधानाची खिल्ली