Pune News | हवेली सह दुय्यम निबंधकांची वरिष्ठांकडून ‘पोलखोल’, तडकाफडकी निलंबित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | हवेली क्र. 22 दुय्यम निबंधक कार्यालयात (haveli registrars office) खासगी व्यक्तींकडून दस्त नोंदणी सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्र यांनी हवेली कार्यालयाची अचानक पाहणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सह दुय्यम निबंधक ए.के. नंदकर (A.K. Nandkar) यांच्या कामाची पोलखोल करुन त्यांना तडकाफडकी निलंबीत केले आहे. ए.के. नंदकर यांच्या निलंबनाचे आदेश नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर (Inspector General of Revenue (IGR) Shravan Hardikar) यांनी काढले (Pune News) आहेत.

Pune News | A K Nandkar suspended by Inspector General of Revenue Shravan Hardikar

नोंदणी उपमाहिनिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक गोविंद कराड (deputy inspector general of registration Govind Karad) यांनी सोमवारी (दि.27) अचानक सह दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्र.22 या ठिकाणी भेट दिली. त्यावेळी कार्यालयात नंदकर हे हजर नव्हते. तसेच कार्यालयातील ऑपरेटर परमेश्वर श्यामसुंदर गाडले व लक्ष्मी नितीन देवरे तसेच खासगी व्यक्ती गणेश अहिरे, आणि एक महिला करंजीकर हे उपस्थित होते. संगणकावर दस्त नोंदणीसाठी आवश्यक असलेला ओटीपी (OTP) हा खासगी महिला करंजीकर यांच्या मोबाईलवर येत असल्याचे दिसून आले.

कार्यालयामध्ये दुय्यम निबंधक ऐ.के. नंदकर हे प्रत्यक्षात हजर नसताना कार्यालयात दस्त नोंदणीचे (diarrhea registration) काम सुरु असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. कार्यालयातील ऑपरेटर परमेश्वर हा कार्यालयीन संगणकावर मुल्यांकनाचे (valuation) काम करत होता, तर दुसरा ऑपरेटर लक्ष्मी देवरे या दस्तास कमी पडलेल्या पानांच्या पावत्या संगणकावर करत होत्या. तर आणखी एक खासगी ऑपरेटर गणेश हा जुन्या डाटा एन्ट्री करत होता. याशिवाय करंजीकर ही महिला सरकारी कर्मचारी नसतानाही दस्तावर शिक्के मारत असल्याचे गोविंद कराड यांच्या निदर्शनास आले.

दस्त नोंदणीच्या वेळी सह दुय्यम निबंधक ऐ.के. नंदकर हे कार्यालयात उपस्थित असणे आवश्यक
होते. पंरतु ते उपस्थित नसतानाही दस्त नोंदणीचा गंभीर प्रकार सुरु होता. तसेच 30 मिनीटात दस्त
नोंदणी होणे आवश्यक असताना नंदकर हे कार्यालयात उपस्थित नसल्याने अनेकांना ताटकळत
राहावे लागले. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन गोविंद कराड यांनी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक
नियंत्रक श्रावण हर्डीकर यांना अहवाल सादर केला होता. यावर कठोर कारवाई करत सह दुय्यम
निबंधक ऐ.के. नंदकर यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले.

हे देखील वाचा

Suspected Death of Judge | हत्या की दुर्घटना ! मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या न्यायाधीशांचा ऑटोच्या धडकेने मृत्यू, मंत्र्याच्या आदेशानंतर तपासासाठी विशेष पथक (व्हिडीओ)

Thane Crime | औरंगाबादमधील पोलिस कर्मचार्‍याचा मृतदेह ठाण्यातील फुटपाथवर आढळल्याने प्रचंड खळबळ


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune News | A K Nandkar suspended by Inspector General of Revenue Shravan Hardikar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update