Pune News : पुणे महापालिकेत बंदोबस्त करण्यास असलेल्या महिला कर्मचाऱ्यास भोवळ, इतर कर्मचाऱ्यांनी सावरले

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) बंदोबस्त करण्यास असलेल्या महिला कर्मचाऱ्यास भोवळ आल्याने त्या खाली कोसळल्याची घटना घडली आहे. बंदोबस्तावर असणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना सावरले. पालिकेत मोठ्या प्रमाणात गदारोळ सुरू होता. त्या गेली चार दिवस पोलीस बंदोबस्तावर आहेत. त्याचा ताण आज जाणवला.

पूजा गवळी असे भोवळ आलेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. पूजा गवळी या मुख्यालयात नेमणुकीस आहेत. आज भामा-आसखेड प्रकल्पाचे उद्घाटन पुणे महापालिकेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता. त्यात दुपार पासून भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत घोषणा बाजी सुरू होती. त्यामुळे दुपारपासून वातावरण तापलेले होते.

दरम्यान, पुणे पोलीस गेली तीन दिवस झाले बंदोबस्तावर आहेत. त्यात आजचा गोंधळ. पूजा गवळी यांना पालिकेत बंदोबस्त डयुटी देण्यात आली होती. हा गोंधळ सुरू असतानाच गवळी यांना पालिकेतच भोवळ आली. त्या खाली कोसळल्या. पण ड्युटीवर असलेल्या इतर महिला कर्मचाऱ्यांनी त्यांना सावरले. पण याठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यात तीव्र नाराजी होती. बंदोबस्ताचा ताण त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.