Pune News | PMPML च्या पिंपरी आगारातील बेंच फिटरने बनवले ‘फिरते वॉशिंग’ सेंटर, तीन दिवसांत निर्मिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पीएमपीएमएलच्या पिंपरी आगारात कार्यरत असलेले बेंच फिटर बाबासाहेब मुलाणी (Bench Fitter Babasaheb Mulani) यांनी कल्पना लढवून अवघ्या तीन दिवसांत ‘फिरते वॉशिंग सेंटर’ (Moving Washing Center) तयार केले आहे. यामुळे बी.आर.टी. मार्गावरील (B.R.T. Route) अस्वच्छ बसथांबे (Bus Stop) पाण्याने धुवून स्वच्छ करता येणार आहेत. यामुळे कमी वेळेत व कमी मनुष्यबळात बसथांबे स्वच्छ होणार आहेत. यामुळे त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक (Pune News) होत आहे.

 

अनेक यांत्रिकी बाबींशी संलग्न काम करणारे कर्मचारी हे कल्पकता लढवून आपल्या परीने कामात सोपेपणा आणण्यासाठी नावीन्यपूर्ण गोष्टी करत असतात. बीआरटी मार्गावरील अस्वच्छ बसथांबे स्वच्छ करण्याच्या अडचणी दूर करण्यासाठी पिंपरी आगाराचे आगार व्यवस्थापक भास्कर दहातोंडे (PMPML Pimpri Depot Manager Bhaskar Dahatonde) व पिंपरी आगार अभियंता राजकुमार माने (Engineer Rajkumar Mane) यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेब मुलाणी यांनी 1 एच.पी.ची मोटार, 2 हजार लिटर पाण्याची टाकी व इतर टाकाऊ साहित्यापासून सर्व्हिस व्हॅनमध्ये ‘फिरते वॉशिंग सेंटर’ तयार केले आहे. (Pune News)

 

बी.आर.टी मार्गावरील बसथांबे कमी वेळेत व कमी मनुष्यबळात पाण्याने धुवून स्वच्छ करणे शक्य होणार आहे.
फिरते वॉशिंग सेंटरसाठी पार्ट कोणते वापरायचे? त्याची रचना कशी करायची? याचा अभ्यास करुन एक डिझाईन तयार करुन पाटर्स बनवून घेतले व ते सर्व्हिस व्हॅनमध्ये जोडले.
सिंगल फेज विजेवर चालणारी मोटार जोडून तीन दिवसांत हे फिरते वॉशिंग सेंटर तयार करण्यात आले.

 

फिरते वॉशिंग सेंटर तयार केल्याबद्दल आगार व्यवस्थापक भास्कर दहातोंडे, आगार अभियंता राजकुमार माने,
फिटर बाबासाहेब मुलाणी यांचे महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया (Om Prakash Bakoria)
व सहव्यवस्थापकीय संचालक प्रज्ञा पोतदार-पवार (Pragya Potdar-Pawar) यांनी कौतुक केले.

 

Web Title :- Pune News | A ‘mobile washing’ center built by a bench fitter at PMPML’s Pimpri Agar, built in three days

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ahmednagar ACB Trap | 50 हजार रुपये लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर एसीबीकडून FIR

Nilesh Rane On Aaditya Thackeray | मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना सुनावले; म्हणाले…

Chinchwad Bypoll Election | चिंचवडचा पुढील आमदार कोण? लक्ष्मण जगताप यांच्या भावाचं मोठे वक्तव्य