Pune News | अनोख्या प्रेमाची अनोखी घटना ! येरवड्यात सामाजिक कार्यकर्तीमुळे 5 वर्षांनी झाली पती-पत्नीची भेट

पुणे : Pune News | तो सैन्य दलात कुलीचे काम करणारा जवान. आपल्या पत्नीवर मनापासून प्रेम करणारा पती, दोन मुले व मुलीसह हे कुटुंब आनंदात असताना अचानक एके दिवशी त्याची पत्नी बेपत्ता झाली. या तरुणाने रात्रीचा दिवस करुन तिचा शोध घेतला. परंतु, कोठेही तिचा पत्ता लागू शकला नाही. असे असतानाच समाज सेविका प्रविणा देशपांडे यांच्या प्रयत्नाने एके दिवशी अमृतसर पोलिसांनी (amritsar police) या तरुणाला तुमची पत्नी येरवडा मनोरुग्णालयात (yerwada mental hospital) असल्याचे सांगितले (Pune News) आणि हा तरुण तातडीने पुण्यात आला. येरवडा मनोरुग्णालयात त्याने आपल्या पत्नीची भेट घेतली. यावेळी पत्नीला पाहून त्याला आपल्या अश्रुंचा बांध आवरता आला नाही. तब्बल ५ वर्षानंतर ही भेट पाहून रुग्णालयातील कर्मचार्‍यांचे डोळेही पाणावले.

अमनसिंग असे या तरुणाचे नाव आहे. तो पंजाबमधील अटारी सीमा सैन्य दलात कुलीचे काम
करतो. अमनसिंग यांची पत्नी मेहक यांच्यावर मानसिक उपचार सुरु होते. त्यातच तिच्या आईचे निधन झाले. त्याचा तिला धक्का बसला व ती एका रेल्वेत बसून अचानक निघून गेली. अमनसिंग आणि त्याच्या नातेवाईकांनी तिचा भरपूर शोध घेतला. पण, तिचा ठाव ठिकाणा लागला नाही.

इकडे पालघर पोलिसांना (palghar police) ही महिला सापडली. त्यांनी तिला ठाणे मनोरुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी तिला येरवडा मनोरुग्णालयात हलविण्यात आले होते. या ठिकाणी समाजसेविका प्रविणा देशपांडे (Social worker Pravina Deshpande) यांनी या महिलेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती केवळ फौजी, कुली, अटारी असे शब्द उच्चारीत असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी अमृतसर पोलिसांना याची माहिती दिली. अमृतसर पोलिसांनी ही माहिती अमनसिंग यांना दिली. अमनसिंग यांना आपली पत्नी पुण्यातील येरवडा मनोरुग्णालयात असल्याचे बुधवारी समजले. त्यांनी तातडीने पुणे गाठले. पत्नीला पाहून त्यांना आपले अश्रु आवरता आले नाही. तब्बल पाच वर्षांनी पती पत्नीची भेट झाली. आता ते आपल्या पत्नीला घेऊन पुन्हा आपल्या गावी गेले आहेत.

हे देखील वाचा

Olympian Footballer | ऑलम्पियन फुटबॉलर एस.एस. हकीम यांचे निधन, 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 197 नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune News | A unique event of unique love! In Yerwada, the couple met after 5 years due to a social worker

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update