Pune News | पुण्यातील तरूणाचा आनोखा प्रयोग | चक्क नाण्यांपासून बनवले आकर्षक ‘शिवलिंग’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | एका युवकाने अनेक वेगवेगळ्या किंमतीची नाणी एकगठ्ठा करुन आकर्षक शिवलिंग (Shivling) तयार केले आहे. दीपक घोलप (Deepak Gholap, Hadapsar) असं त्या युवकाचे नाव असून तो पुण्यातील (Pune News) काळेपडळ येथे वास्तव्यास आहे. दीपकने 22 हजार 301 नाण्यांचा त्यासाठी वापर केला आहे. गतवर्षी या शिवलिंगाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (India Book of Records) नोंद झाली आहे. विशेष म्हणजे जगातील अशा प्रकारचे हे पहिलेच शिवलिंग असल्याचा दावा दीपकने केलाय.

 

हडपसरच्या (Pune News) काळेपडळ (kalepadal, hadapsar) येथील दीपक घोलप (Deepak Gholap) युवक एक शिवभक्त (Shivbhakt) आहे. तो रोज शिवमंदिरात दर्शनासाठी जात असतो. शिवलिंग प्रतिमा त्याला कायम आकर्षक करते. आपण त्यात काहीतरी आनोखं करावं, असा विचार तो करत होता. नंतर, नाण्यांचा वापर करून शिवलिंग बनविण्याची संकल्पना दीपकच्या डोक्यात आली. त्यानंतर त्यानं 2,5,10 रूपयांची नाणी जमवायला सुरूवात केली. तब्बल 4 महिने मेहनत घेतली. शेवटी एक आकर्षक शिवलिंग उभा केले. बनविलेले शिवलिंग बघण्यासाठी अनेक लोक दीपकच्या घरी जात असतात. मागील एक वर्षापासून या शिवलिंगाबाबत अनेक चर्चा (Pune News) होत आहेत.

 

माझी मोबाईल शॉपी आहे. कामा व्यतिरिक्त मी इतर कोणताही छंद जोपासलेला नाही. मी शिवाचा भक्त असल्याने शिवलिंगाच्या दर्शनासाठी म्हणून दररोज शिवालयात जातो. जगात कुणीही संकल्पना राबवली नसेल, असे शिवलिंग बनविण्याचा माझा मानस होता. नाण्यांपासून अशी चांगली कलाकृती होईल, असा विचार करून 4 महिने नाणी जमा करून हे आकर्षक शिवलिंग बनविता आले, असं दीपकने सांगितलं (Pune News) आहे.

दरम्यान, 4 महिने नाणी जमा करून हे आकर्षक शिवलिंग बनवले आहे.
त्यासाठी दीपकने एकूण 22 हजार 301 नाणी जमा केला आहे. त्यात 2 रुपयांची 14 हजार 916 नाणी होते.
तर 5 रुपयांची 4 हजार 875 नाणी त्याचबरोबर 10 रुपयांची 2 हजार 510 नाणी होते.
असे एकूण 79 हजार 301 रुपये त्याने एकत्र केले होते.

 

Web Title :- Pune News | A unique experiment of a shivbhakt deepak gholap from hadapsar of Pune | Attractive ‘Shivling’ made from chucky coins

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vijay Wadettiwar | विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा, म्हणाले -‘फडणवीस आणि गडकरी यांच्यात 36 चा आकडा’

Jitan Ram Manjhi | ‘नवनीत राणांसह 5 खासदार बनावट जात प्रमाणपत्रावर लोकसभेत निवडून गेले’; ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

Pune Crime | पुणे जिल्ह्यात प्रचंड खळबळ ! शिरुरमधील ‘बँक ऑफ महाराष्ट्र’वर भरदिवसा ‘सशस्त्र’ दरोडा; कोट्यावधीचं सोनं आणि रोकड लंपास (CCTV व्हिडीओ)