Pune News : चांदणी चौकात महिलेची सोनसाखळी हिसकाविली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दुचाकीवर आलेल्या सोन साखळी चोरट्यांनी पादचारी महिलेच्या गळ्यातील ३९ हजारांची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना चांदणी चौकात घडली आहे. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात 40 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोन साखळी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला बुधवारी चांदणी चौक परिसरातून रस्त्याने पायी चालत घरी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीवर चोरट्यांनी त्यांच्याजवळ येउन गळ्यातील ३९ हजारांची सोनसाखळी हिसका मारून चोरून नेली. महिलेने आरडा-ओरडा करेपर्यंत चोरटे पसार झाले. अधिक तपास सहायक निरीक्षक शेवते तपास करत आहेत.