Pune News | रायरेश्वर किल्ल्यावर तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यु

0
228
Pune News | A young man died of cardiac arrest at Raireshwar fort
File Photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | भोर तालुक्यातील (Bhor News) रायरेश्वर किल्ल्यावर (Raireshwar Fort) महाविद्यालयीन तरुणाचा हृदयविकाराच्या (Heart Attack) धक्क्याने मृत्यू (Death) झाल्याची घटना शुक्रवारी घडली. शुभम प्रदीप चोपडे Shubham Pradeep Chopde (वय १७, रा. बारामती, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. (Pune News)

 

शुभम बारामतीतील (Baramati News) शारदाबाई पवार कनिष्ठ महाविद्यालयात (Shardabai Pawar Junior College) शिक्षण घेत होता. शुक्रवारी महाविद्यालयाची सहल रायरेश्वर किल्ला परिसरात आली होती. रायरेश्वर किल्ला चढत असताना कोरले गावाजवळ शुभमला हृदयविकाराच्या झटका आला. तो बेशुद्ध पडला. त्याला तातडीने ग्रामस्थांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती भोर तालुक्याच्या तहसीलदारांनी दिली. (Pune News)

शुभम मनमिळावू स्वभावाचा होता. त्याचा अकस्मात मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीय, शिक्षकवर्ग तसेच विद्यार्थ्यांना धक्का बसला.

 

Web Title :- Pune News | A young man died of cardiac arrest at Raireshwar fort

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा