Pune News : डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने तरूणाचा जागीच मृत्यू, धायरीमधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वेगातील डंपरने दुचाकीला धडक दिल्याने खाली पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाच्या डोक्यावरून डंपरचे चाक गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. धायरी तील आकाशदीप सोसायटीसमोर सोमवारी सायंकाळी हा अपघात घडला आहे.

ज्योतीराम राजाभाऊ शिंदे (वय 24) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी डंपरचालक जयकरण बैजूलाल सहानी (वय 24) याच्याविरोधात सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अजित महादेव लोहाप (वय 27) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी फिर्यादी आणि ज्योतीराम शिंदे हे उंबऱ्या गणपती चौकातून धायरी फाट्याकडे दुचाकीने जात होते. यावेळी आकाशदीप सोसायटी समोरून जात असतांना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामुळे जोतीराम शिंदे हे दुचाकीवरून खाली पडले आणि त्याच डंपरचे चाक त्याच्या डोक्यावरून गेले यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक तनपुरे करीत आहेत.