Pune News | आधार सेवा केंद्राचा ‘धन्वंतरी आपल्या दारी’ कार्यक्रम उत्साहात संपन्न ! डॉ.जगन्नाथ दीक्षित म्हणाले – ‘मधुमेहावर नियंत्रण आणणे शक्य’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | आपल्या देशात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून तरुण वयात ही मधुमेहाने झडलेले अनेक युवक बघायला मिळतात हा देशाच्या दृष्टीने देखील चिंतेचा विषय आहे, मात्र मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी व तसेच वजन कमी करण्यासाठी योग्य प्रकारे नियोजन करून योग्य मार्गदर्शनाच्या आधारे त्याचे तंतोतंत पालन केले तर मधुमेहासारखे असाध्य रोग देखील नियंत्रणात आणता येऊ शकतील. गोळ्या अथवा इन्सुलिन हा तात्पुरता उपाय आहे, कायमचा मधुमेह नष्ट करण्यासाठी व मधुमेह मुक्त होण्यासाठी कंबर कसून काम केले पाहिजे, यासाठी 100, 200, 300 मधुमेह रुग्णांची छोटी युनिट्स करून त्याद्वारे चांगले मार्गदर्शन मिळून मधुमेह नियंत्रण आणणे अखेरीस मधुमेह मुक्त होणे असे प्रतिपादन ज्येष्ठ मधुमेह तज्ञ डॉ जगन्नाथ दीक्षित (dr jagannath dixit) यांनी केले. पुण्याच्या (Pune News) सहकार नगर भागातील तुळशीबागवाले मैदानात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढणार, CBI कस्टडी घेण्याच्या तयारीत

आधार सेवा केंद्राचे अध्यक्ष हेमंत आबा बागुल (Hemant Aba Bagul) यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे मनपा काँग्रेस पक्ष नेते आबा बागुल (PMC Congress Group Leader Aba Bagul) होते. याप्रसंगी सांस्कृतिक दिवाळीतील हा कार्यक्रम सर्वांना उपयोगी पडो अशी प्रारंभी सदिच्छा व्यक्त करून हेमंत बागुल म्हणाले की, ”स्वतः साठी वेळ काढून नाही जगलात तर काय जगलात” असे सांगत देशात 10 कोटीहून अधिक मधुमेह नागरिक असून त्याची संख्या वाढत आहे मानसिक ताण, अयोग्य आहार, व्यसनाधीनता बैठे जीवन व व्यायामाचा अभाव या पाच गोष्टींमुळे हा रोग जडतो व डॉ जगन्नाथ दीक्षित यांच्या सारख्यांचा सल्ला तंतोतंत आत्मसात केला पाहिजे असे सांगून सर्वांना मधुमेह मुक्त होणाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे मनपा काँग्रेस पक्ष नेते आबा बागुल म्हणाले की मधुमेहासारखे रोग नियंत्रित आणणे प्रत्येकाचे स्वप्न असून त्यासाठी धन्वंतरी आपल्या दारी असा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आरोग्याची गोळी बाजारात कुठेही विकत मिळत नाही असे सांगून केवळ वयाच्या 60 व्या वयापासून नव्हे तर तरुण वयापासून हृदय विकार, ब्लड प्रेशर, असे विकार जडणार नाहीत यासाठी डॉ जगन्नाथ दीक्षित यांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे होते.

Aryan Khan Drugs Case | नवाब मलिकांचा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘खंडणीसाठी ‘आर्यन’चं अपहरण, वानखेडेंशी घनिष्ठ मैत्री असणारे भाजपा नेते मोहित कंबोज मास्टर माईंड’ (व्हिडीओ)

यावेळी डॉ जगन्नाथ दीक्षित म्हणाले की, मधुमेह हा वंशपरंपरागत रोग आहे तसेच अनेक कारणांमुळे ही व्याधी जडू शकते आपल्याला त्यावर सातत्याने देखरेख करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि तो नियंत्रनात आणता येऊ शकतो हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे देशात आता वैद्यकीय आरोग्याबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकता येत असून हेमंत बागुल यांच्या सारख्या तरूणांनी अश्या प्रकारच्या व्याख्यानाचे आयोजन करणे ही देखील कौतुकाची बाब आहे

जगभरात फिरताना मधुमेहाची व्याधी किती मोठी आहे याची जाणीव होते, याचे दुष्परिणामही अनेकांनी अनुभवले आहे
मधुमेह नियंत्रणात आणण्यासहित मधुमेह मुक्त होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत त्या पध्दतीची जीवनशैली
अंगिकारली तर आपण मधुमेह मुक्त जीवन जगू यापासून सुटका होऊ शकते, यासाठी छोटे युनिट्स करून 100 मधुमेह
रुग्णांनी एकत्र येऊन सातत्याने तपासणी करणे ज्यास दीक्षित डाएट म्हंटले जाते त्याचा अवलंब करत चळवळ उभी
केली पाहिजे तरुणांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले पाहिजे अशी आशा डॉ जगन्नाथ दीक्षित यांनी यावेळी
व्यक्त केली

याप्रसंगी आधार सेवा केंद्र अध्यक्ष हेमंत बागुल यांनी स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया देसाई यांनी केले
घनश्याम सावंत यांनी आभार प्रदर्शन केले

यावेळी मंचावर विशेष उपस्थिती म्हणून प्रसन्नजीत फडणवीस, राजीव बर्वे, सौ बर्वे, धोंगडे काकू ,देशपांडे असे अनेक
मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमा नंतर प्रश्नोत्तरे घेण्यात आली यावेळी डॉ जगन्नाथ दीक्षित यांनी अनेक नागरिकांना
विविध प्रश्नांची उत्तरे देत मार्गदर्शन (Pune News) केले.

हे देखील वाचा

Pune Crime | अपघात की घातपात ! पुण्यात पुरूष आणि महिलेचा मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ, मुंढवा परिसरातील घटना

Anil Deshmukh | मुंबई उच्च न्यायालयाकडून अनिल देशमुखांना दणका ! पुन्हा ED च्या कोठडीत रवानगी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune News | Aadhar Seva Kendra’s ‘Dhanvantari Aaplya Dari’ program completed with enthusiasm! Dr. Jagannath Dixit says – ‘Diabetes can be brought under control’ hemant aba bagul

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update