Pune News | आम आदमी पक्षातर्फे पुण्यात ‘भरोसा सेल’ची स्थापना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | आज आम आदमी पक्षातर्फे (aam aadmi party) पुण्यात भरोसा सेलची (Bharosa Cell) स्थापना करण्यात आली असून या सेलद्वारे बँकिंग, जमीन व्यवहार, क्रेडिट कार्डसंबंधी फसवणूक, शासकीय अधिकारी – कर्मचारी यांच्याकडून केली जाणारी टाळाटाळ आणि बिल्डरांकडून केली जाणारी अडवणूक याबाबत नागरिकांना मार्गदर्शन आणि मदत करण्यात येणार (Pune News) आहे, असे आम आदमी पक्षाचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार Vijay Kumbhar (9923299199) यांनी जाहीर केले आहे.

 

गेल्या काही काळामध्ये मोठ्याप्रमाणावर बँकिंग आणि क्रेडिट कार्ड फसवणूक उघडकीस आले आहेत. अनेक पुणेकर कुटुंबांची त्यामुळे फसवणूक झाली आहे. तसेच बँकांनी, फायनान्स कंपन्यांनी दिलेली कर्जे मनमानी पद्धतीने गुंडांचा वापर करत वसूल केल्या जाण्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. जमीन व्यवहारात होणारी फसवणूक, काही बिल्डरांकडून होणारी ग्राहकांची अडवणूक ही मोठ्या प्रमाणावर होत आहे. योग्य मार्गदर्शन अभावी हे नागरिक अनेकदा न्याय मिळवण्यात अपयशी ठरतात. या नागरिकांना योग्य मार्गदर्शन करुन दिलासा देण्यासाठी आम आदमी पक्षातर्फे पुण्यात भरोसा सेल स्थापन करण्यात आला आहे. भरोसा सेलमध्ये आलेल्या तक्रारींची छाननी करुन तज्ञांच्या मदतीने या नागरिकांना मार्गदर्शन व मदत केली (Pune News) जाणार आहे.

 

याबाबत ज्यांना मदत व मार्गदर्शनाची गरज आहे त्यांनी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत आम आदमी पक्ष कार्यालय, अनुपमा सोसायटी, ए -६, औंध क्षेत्रीय कार्यालयासमोर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. येताना लिखित तक्रार आणि सर्व संबंधित कागदपत्रे सोबत घेऊन यावीत.

 

Web Title :- Pune News | Aam Aadmi Party establishes ‘Bharosa Cell’ in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा