Pune News | पुण्यातील गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीला अडथळा ठरणारा लकडी पूलावरील मेट्रो पूलाबाबत मध्यम मार्ग काढणारच – आबा बागूल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणूक परंपरा थांबविता येणार नाही व विसर्जन मिरवूणकीस अडथळा होत असल्याने यावर सविस्तर चर्चा करणेसाठी आज (गुरूवार) महापौर यांचे निवासस्थानी महापौर मुरलीधर मोहोळ (Mayour Muralidhar Mohol), उपमहापौर सुनिता वाडेकर (deputy mayor sunita wadekar), महामेट्रोचे प्रमुख ब्रिजेश दिक्षित (dr. brijesh dixit – managing director, maha metro), मेट्रोचे अधिकारी गाडगीळ, पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर (pmc leader of house ganesh bidkar), पुणे महापालिकेचे (PMC) संबंधित अधिकारी व मेट्रोचे संबंधित अधिकारी, आर्किटेक्ट अतुल राजवाडे, तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुनिल रासने, तुळशीबाग सार्वजनिक गणेशात्सव मंडळाचे विकास पवार, सुबंध चकोर, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे परेश खांडके, अखिल मंडई मंडळाचे संजय मते व तुषार रायकर, संकेत मते, निखिल मलानी, आनंद सागरे व गणेश मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांचेसह काँग्रेस गटनेते आबा बागूल (Congress Group Leader Aba Bagul) उपस्थित होते. (Pune News)

 

 

जे पुण्यात (Pune News) पिकते ते जगात विकते यामुळे ऐतिहासिक लकडी पूलावरून जाणाऱ्या गणेशोत्सव मिरवणूकी संदर्भात मेट्रो अधिकारी यांचे समवेत झालेल्या बैठकीत सकारात्मक मार्ग काढणेसाठी टेक्निकल टिम बोलवा, याचे प्रेझेंटेशन आराखडा तयार करून मा.महापौर यांचेसमोर सादर करा असे महामेट्रोचे प्रमुख मा. ब्रिजेश दिक्षित यांनी आदेश दिले. सकारात्मक पध्दतीने हा विषय हाताळल्यास नक्कीच ऐतिहासिक पुण्यात एक युनिक स्पॉट होण्याची शक्यता असून यावर मा.महापौर यांनी सकारात्मक भूमिका घ्या असे मेट्रो अधिकारी यांना आदेश दिले. या बैठकीमध्ये गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी अशक्य कोणतीच बाब नाही, Be Positive पध्दतीने विचार केला तर होवू शकते अशी मागणी केली.

 

यावेळी गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणूक ही परंपरा जपणे गरजेचे आहे व विकास देखील करणे गरजेचे आहे
असे काँग्रेस गटनेते आबा बागूल म्हणाले. बैठकीतील सकारात्मक प्रतिसादामुळे गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आनंद व्यक्त (Pune News) केला.

 

 

पुण्यातील गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीला अडथळा ठरणारा लकडी पूलावरील मेट्रो पूलाबाबत मध्यम मार्ग काढणारच
असा विश्वास महापौर मुरलीधर मोहोळ यांचे समवेत सर्व उपस्थित पदाधिकारी, अधिकारी व कार्यकर्ते यांनी व्यक्त केला.

Web Title :- Pune News | Aba Bagul to pave way for metro bridge over wooden bridge that hinders Ganpati immersion procession

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Post Office Schemes | दररोज 150 रुपयांच्या सेव्हिंगने बनवू शकता 15 लाखापर्यंतचा फंड; Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये करा गुंतवणूक

Pune Crime | 11 गंभीर गुन्ह्यातील आरोपी अ‍ॅड. सागर सुर्यवंशीची येरवडा जेलमध्ये रवानगी

Pune RTO | पुणेकरांचा रिक्षा प्रवास महागणार, RTO कडून रिक्षाच्या दरवाढीस मंजुरी; जाणून घ्या किती रुपये वाढणार