प्रेमाचा ‘मामला’ तरुणीला अडीच लाखाला पडला

पुणे,पोलीसनामा ऑनलाइन -तरूण तरुणीचे प्रेम जुळल्यानंतर कुटुंबियांना माहिती सांगून बदनामी करण्याच्या भितीने एकाने तरुणीकडून तब्बल अडीच लाख रूपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी तरुणाविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात विनयभंग आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २४ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे.

पंकज रमाकांत गदादे (वय २६, रा. कर्वेनगर) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी आणि पंकज एकमेकाच्या ओळखीतुन प्रेमात पडले. त्यांनतर पंकजने तरुणीचा पाठलाग करून सतत पैसे मागितले. पैसे न दिल्यास प्रेम प्रकरनाची माहिती तरुणीच्या कुटुंबियांना देण्याची धमकी त्याने दिली होता. याभितीने तरुणीने सप्टेंबर २०१८ पासून आजपर्यंत पंकजला तब्बल अडीच लाख रूपये दिले आहेत. तरीही त्याने तरुणीचा पाठलाग करून त्रास दिला. त्यामुळे तरुणी गेल्या काही दिवसांपासून त्याचा फोन स्वीकारत नव्हती. त्याला भेटत देखील नव्हती. त्यामुळे पंकजने तरुणीला रामोशी गेट चौकाजवळ गाठून फोन का घेत नाहीस, म्हणून तिला शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी तरुणीने समर्थ पोलिसांकडे तक्रार दिली आहे. याप्रकरणी समर्थ पोलिस अधिक तपास करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like