हाऊस लाख मोलाची…उगाच म्हणतात का…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हाऊस लाख मोलाची अस उगाच नाहीत म्हणत… मग, त्यासाठी वाटेल ते… विवाह असो अजून काही. आता बगा ना, थाटातच नवर देव यावा म्हणून पुण्यात त्याला विवाहस्थळी घेऊन जाण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करू लागले आहेत. गेल्या अन् या वर्षात पुण्यात अश्या 7 जणांनी नवरदेव मंडपात थाटातच नेला आहे. त्यामुळे आमचा नाद नाय करायचा या म्हणीची आठवण होऊ लागली आहे.

पुणे शहरात 2019 मध्ये 5 आणि 2020 मधील दोन महिन्यात 2 जणांनी ही हाऊस पूर्ण केली आहे. दरम्यान हेलिकॉप्टरचे उड्डाण आणि लँडिंग करण्यासाठी पोलिसाची परवानगी लागते. त्यासाठी विशेष शाखेत अर्ज करावा लागतो. अशा 7 जणांनी परवानगी घेऊन आपली हाऊस पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे हेलिकॉप्टरचे 1 तासाचे भाडे 70 हजार ते 1 लाख आहे. ते भाडे देऊन हेलिकॉप्टर मागविले जात आहेत. त्यामुळे पोलीसही आवक झाले आहेत.

मुला-मुलींचा विवाह ऐटीत करण्यासाठी अनेक बड्या भांडवलदारासह गुंठामंत्री शेतकऱ्याकडून हेलिकॉप्टर सवारी केली जात आहे. त्यासाठी हेलिकॉप्टरद्वारे वधु आणि वराला लग्नसमारंभी पोहचविण्याचे फॅड वाढले आहे.

गेल्या वर्षभरात 5 जणांनी हेलिकॉप्टर लॅडिंग केले असून वधूसह वराला लग्नसमारंभी उतरविले आहे. खासगी समारंभासाठी हेलिकॉप्टर टेक ऑफ आणि लॅडिंगसंदर्भात सुरक्षिततेची जबाबदारी अर्जदारावर अवलंबून असते. त्यासाठी अर्जदाराला विशेष शाखेकडे कार्यक्रम पत्रिका, हेलिकॉप्टर लॅिंडग आणि टेक ऑफ, संबंधित जागेचा नकाशा, उतारा, प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. त्यानंतर विशेष शाखेकडून संबंधित पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अहवाल मागतिला जातो. त्यानंतर सर्व कागदपत्रांसह सुरक्षिततेची हमी घेतल्यानंतर अर्जदाराला हेलिकॉप्टर टेक ऑफ आणि लॅडिंगची परवानगी दिली जाते.

शहरातील चंदननगर, खराडी, लोणी काळभोर, हडपसर, बालेवाडी परिसरातून हेलिकॉप्टरचे उड्डाण करुन वधू-वरांना इच्छितस्थळी पोहचविले जात आहे. हेलिकॉप्टरने टेक ऑफ केल्यापासून ते लँडिंग होईपर्यंत खर्च एकत्रित केला जातो. दिवसेंदिवस नागरिकांकडून हेलिकॉप्टर उड्डाणाला मागणी वाढली आहे. त्यामुळे किमान एक महिनाआधी बुविंâग करावे लागत आहे. मात्र, या सगळ्यांमध्ये पुणेकरांच्या हौसेला दाद द्यावी तेवढी कमीच आहे.