बांधकामे अधिकृत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्गी लावणार : आढळराव पाटील

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन ( कल्याण साबळे पाटील) – पीएमआरडीए हद्दीतील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासंदर्भात नवीन नियमावली करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिले.

शिरूर-हवेली मतदार संघातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी वाघोली येथे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख  ज्ञानेश्वर कटके यांनी विशेष सभा घेतली. त्या सभेत आढळराव पाटील बोलत होते. आढळराव यांनी चुकीच्या नियमावली बाबतही टिका करून एक ते दोन गुंठ्यांत गरिबांची जी घरे झाली आहेत त्यांना शासकीय नियमानुसार कर आकारणी करून ती नियमित करण्यात यावीत असे अनेक  प्रश्नावर मुख्यमंत्री यांच्यासोबत तातडीने बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी ज्ञानेश्वर कटके, प्रशांत काळभोर, सुरेश सातव, रोहिणी गोरे, विक्रम कुटे, अनिल काशीद, राजेंद्र पायगुडे, विपुल शितोळे, मच्छिंद्र सातव, रामकृष्ण सातव, रामदास भामगर, मारुती गाडे, सुनील जाधवराव, रेश्मा पाचारणे, कविता दळवी, मालती गोगावले, सागर गोरे, मंगेश सातव, सुधीर दळवी, विजय दळवी, रवी कुटे, माऊली आव्हाळे, विवेक बिडगर, अनिल पासलकर, राहुल हरगुडे, संतोष कटके, किरण उंदरे तसेच आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

You might also like