आज पासून पुण्यात रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात सर्वात मानाची मानली जाणारी ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पुणे सज्ज झाली आहे. म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आजपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे.

पुणे शहरातील निवड चाचणी स्पर्धेत महाराष्ट्र केसरीचा दावेदार अभिजित कटके तर जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत आदर्श गुंडची निवड झाली आहे. गतविजेता बाला रफिक शेखने निवड चाचणी पूर्ण केली असून कटके व बाला रफिक दोघेही डबल केसरी किताब घेण्यासाठी मेहन घेत आहेत.

महाराष्ट्र केसरी स्पर्धा दहा वजनी गटात होणार असून त्यामध्ये प्रत्येक गटामध्ये माती आणि मॅट अशी वर्गवारी करण्यात आली आहे. यापैकी 86 ते 125 वजनी गटातील माती आणि मॅट गटाच्या विजेत्या पेहलवानांमध्ये महाराष्ट्र केसरीची कुस्ती होणार आहे. आज (शुक्रवार) गदा पूजन होणार असून शनिवार (दि.4 जानेवारी) पासून कुस्त्यांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे यावर्षी ‘महाकेसरी’ कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

तालुका तसेच जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचा आखाडा महाराष्ट्रात सर्वत्र भरला. पुण्यातील स्पर्धेत 900 ते 950 मल्लांनी सहभाग घेतला. खासगी बांधकाम व्यावसायिकांद्वारे प्रथमच ही स्पर्धा होत आहे. पुण्यातील स्पर्धेत 44 संघ सहभागी होणार असून या स्पर्धेची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. पुण्यात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी अभिजित कटकेची पुण्यातून निवड झाली आहे. गाडी विभागातून त्याने विजय मिळवल्याने त्याचा सगल चौथ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/