‘भरोसा’ आणि ‘सेवा’ उपक्रम राज्यभर राबवा, खा. सुळे गृहमंत्र्यांकडे मागणी करणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलिसांचे काम उत्कृष्ट आहे. नागरिकांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. विशेषकरून ‘भरोसा सेल’ आणि ‘सेवा उपक्रम’ अत्यंत चांगले असून, हे दोन्ही उपक्रम राज्यभर राबवावे, अशी मागणी आपण गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

पुणे पोलीस आयुक्तालयाला खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी भेट दिली. यावेळी त्यांनी विविध उपक्रमांची माहिती घेतली. भरोसा आणि सेवा उपक्रमाची माहिती घेतली. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटशेम, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
mp supriya sule
पुणे पोलिसांकडून नाविण्यपुर्ण उपक्रम राबविले जात असल्याचे सांगत सुळे म्हणाल्या महिला आणि जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबद्दल पोलिसांचा भरोसा सेल आणि जेष्ठ नागरिक उपक्रम चांगला आहे. त्यामुळे अनेक महिलांसह जेष्ठांना आधार मिळत आहे. तर सेवा उपक्रमाद्वारे नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण केले जात आहे. त्यांना पोलिसांबाबत विश्वास निर्माण होत आहे.

भरोसा सेल व सेवा उपक्रम उत्कृष्ट असून राज्यभरात दोन्ही उपक्रम राबविण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे आग्रही मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तंबाखू, गुटख्यावर कारवाई करा
राज्यात गुटखा बंदी आहे. परंतु, तरीही शाळा, महाविद्यलयाच्या परिसरात तंबाखू जन्य पदार्थ तसेच गुटख्याची विक्री होते. याबाबत सुप्रिया सुळे यांनी शहरातील शाळा व महाविद्यालयाच्या परिसरातील तंबाखू जन्य पदार्थांची होणारी विक्री बंद करून त्यावर कारवाई करण्याची सूचना यावेळी पुणे पोलिसांना दिली आहे.

You might also like