पुण्यातील PMPML प्रवाशी हैराण, चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील पीएमपीएल प्रवासादरम्यान होणार्‍या चोर्‍यांचे सत्र कायम असून, एकाच दिवशी चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. यात 21 हजारांचा ऐवज चोरला असून, एकाला पकडले आहे. शेवाळेवाडी -स्वारगेट आणि खराडी-विमानतळ बसप्रवासात ह्या घटना घडल्या.

याप्रकरणी 54 महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या शेवाळवाडी परिसरात राहण्यास आहेत. त्यांना स्वारगेट येथे कामानिमित्त आले होते. दरम्यान, त्या शुक्रवारी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास शेवाळेवाडी ते स्वारगेट असा बसप्रवास करीत होत्या. त्यावेळी बसमध्ये गर्दी होती. त्याचा फायदा घेउन चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतून रोकड, सोन्याचे दागिने मिळून 19 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

तसेच, दुसरी घटना खराडी बायपास ते विमानतळ बसप्रवासात घडली आहे. यावेळी दोन प्रवाशांची दीड हजारांची रोकड चोरणार्‍यास पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. वसंत विजय जाधव (वय 36) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे अधिक तपास करीत आहेत.