पहिल्याच पावसात तारांबळ, शहरात झाडपडी अन पाणी साचल्याच्या घटना…

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वाऱ्यात शहरात 13 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. तर 9 ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास गेल्या वर्षी सारखीच परिस्थिती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळ काही वेळात धडकणार आहे. त्यामुळे राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शहरात देखील दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. या वादळी वाऱ्यात शहरात झाडपडीच्या 13 ठिकाणी घटना घडल्या आहेत. यात सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडलेली नाही. तर दुसरीकडे शहरात विविध भागात 9 ठिकाणी पाणी साचले आहे. त्याचा त्रास पुणेकरांना प्रवास करताना सहन करावा लागला आहे. अग्निशमन दलाकडे ही माहिती आली आहे. त्यानुसार अग्निशमन दलाने झाडे बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली आहे.

शहरातील कोथरूड, हडपसर, विश्रांतवाडी, विमाननगर, पाषाण, मुंढवा, कोरेगाव पार्क, येरवडा, गंजपेठ, मालधक्का चौक, मनपा अश्या भागात झाडपडीच्या घटना घडल्या आहेत.
तसेच पाणी साठल्याच्या चंदननगर अग्रवाल सोसायटी, येरवडा येथील शांतिरक्षक सोसायटी, ससाणेनगर प्रभाग क्रमांक 23, लोहगाव येथील डी.वाय. पाटील पार्क परिसर, येरवडा येथे लक्ष्मीनगर, टिंगरेनगर ले.न. 11 हडपसर तसेच येरवडा गंगाधाम अश्या परिसरात घटना घडल्या आहेत.