स्मार्ट पोलीस ठाणी ‘उधारी’च्या ‘बोजाखाली’ ! हिशोब कसा चुकता करायचा असा प्रश्न ‘कलेक्टर’ अन् संबंधितांना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे पोलीस आयुक्तालयाचा चेहरा मोहरा बदल्यानंतर शहरातील 30 पोलीस ठाणी स्मार्ट करण्यात येत आहे. पण, ही स्मार्ट पोलीस ठाणी उधारीच्या बोजाखाली अडकले असून, रंगरंगोटी तर झाली पण त्यांचा हिशोब कसा चुकता करायचा असा प्रश्न आता पोलीस ठाण्यांचे कलेक्टर अन् संबंधितांना पडला आहे. मात्र, पोलीस ठाणी चकाचक झाल्याचे समाधान आहे.

पुणे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर डॉ. के. व्यंकटेशम यांनी तीनही स्थरावर पुणे पोलीस दलात कामास सुरूवात केली. प्रथम बेसिक पोलीसींगवर भर दिला. त्यासोबतच, पोलीस दलातील उनीवा, कमतरता आणि सुख-सुविधा पाहिल्या. यानंतर अवैध धंदे अन् त्याला पाठबळ आणि त्यातून माया मिळविणार्‍यांना धडा शिकवण्यास सुरूवात केली. पुण्या सारख्या शहरात प्रथम गेल्या काही महिन्यांपासून अवैध धंदे कडेकोट बंद असल्याचे पाहिला मिळत आहे. अनेकांना मात्र, यामुळे झोपा येत नसल्याचे वास्तव आहे. पण, शहराच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचे होते, असे काही अधिकारी आणि कर्मचारी खासगीत बोलवून दाखवतात.

अधिकारी बदलून आल्यानंतर त्याच ऑफिस रंगरंगोटीकरून चकाचक करण्यावर भर देत असल्याचे पाहिला मिळते. हे प्रत्येकवेळी पाहिला मिळत. पुण्यातही यापुर्वी असेच झाले. प्रत्येकजन आप-आपल्या कार्यालयाचीच डागडुजीकरून त्याला चकाकी दिली. पण, प्रथमच पोलीस आयुक्तांनी पोलिस आयुक्तालयाचा सर्वांगिण बदल केला. आता पोलीस आयुक्तालयात येणार्‍या प्रत्येकाला फोटो काढायचा मोह आवरत नाही, हेही वास्तव आहे. आयुक्तालयात स्वतंत्र गुन्हे शाखेसाठी इमारत, चौथ्या मजल्यावर सुसज्ज असे हॉल आणि इतर सुविधा केल्या गेल्या आहेत.

काही महिन्यांपुर्वी पोलीस आयुक्तांनी स्थानिक पोलीस ठाण्याच्या कलेक्टरांनाच आयुक्तालयात एकत्रित आमंत्रित केले होते. तसेच, त्यांना पोलीस ठाण्यांमधील सुविधा तसेच इतर गोष्टी करण्यास सांगण्यात आले होते. तत्पुर्वी एकाचवेळी सर्व कलेक्टरांना बोलविण्यात आल्याने त्या दिवशी वरिष्ठांचे धांबेदणाणले होते. अनेकांनी फोन बंदकरून कलेक्टरांची पोलीस ठाण्यात कधी येतात आणि नेमकं काय झाल हे ऐकण्यासाठी ठाण मांडल होत.

यानंतर शहरातील पोलीस ठाण्यांच्या रंगरंगोटीपासून ते सर्व सुविधायुक्त कामाला सुरूवात करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याचे काम करण्यात येत आहे. या कामकाजाची पाहणी आणि कमतरता पाहण्याची विशेष शाखेत कार्यरत असणार्‍या वरिष्ठ निरीक्षकांना जबाबदारी देण्यात आली आहे. ते प्रत्येक पोलीस ठाण्यात जाऊन तेथील पाहणी करतात. तसेच, काही कमतरता असल्यास पुन्हा करण्यास सांगतात.

स्वच्छता गृह, रेस्टरूम, रंग, सुशोभीकरण, लाईटींग, बोर्ड इथपासून पुर्ण बदल करण्यात येत आहे. पण, हे बदल करताना याचा खर्च करताना कलेक्टर आणि वरिष्ठांना नाकी नऊ येत आहे. काही पोलीस ठाण्यांना याला नकार दिला. तर, केलेल्या कामांचे बील आयुक्तालयात पाठविले आहेत. पण, पोलीस ठाणी आता हा खर्चकरून कर्जबाजारी झाले असून, तो खर्च कसा भरून काढायचा अशी चिंता लागली आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/