इनामके मळा SRA ट्रान्झीट कॅम्प घोटाळा, पाहाणीसाठी अधिकार्‍यांचे पथक जाणार : राजेंद्र मुठे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन टीम –  लोहियानगर येथील इनामके मळ्यातील एसआरए ट्रान्झीट कॅम्पमधील सद्यस्थितीची पाहाणी करण्याकरिता अधिकार्‍यांचे पथक लवकरच पाठविण्यात येणार आहे. इनामके मळ्यातील एसआरए ट्रान्झीट कॅम्प विकसकाला भाडेतत्वावर देताना आर्थिक अनियमीततेसोबतच ट्रान्झीट कॅम्पमधील गाळ्यांचा दुरूपयोगही करण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार याप्रकरणी चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या मालमत्ता विभागाचे प्रमुख उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी दिली.कासेवाडी येथील झोपडपट्टी जळितग्रस्तांसाठी भवानी पेक्ष क्षेत्रिय कार्यालयाच्यावतीने इनामके मळा फा.प्लॉट १५४ येथे ट्रान्झिट कॅम्प बांधण्यात आला आहे. खेळाच्या मैदानाचे आरक्षण असलेल्या जागेवरील या कॅम्पमध्ये २६४ गाळे आहेत. कॅम्पमधील नागरिकांची मुळ ठिकाणी सोय झाल्यानंतर हा कॅम्प काढून टाकणे अपेक्षित होते. परंतू यानंतर लगतच असलेल्या लोहियानगरमधील झोपडपट्टीवासियांसाठी एसआरए योजनेचे काम सुरू झाल्यानंतर तेथील नागरिकांना २०११ ला या ट्रान्झीट कॅम्पमध्ये हलविण्यात आले. नुकतेच विकसकाला आणखी तीन वर्षे मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव शहरसुधारणा समिती आणि पाठोपाठ स्थायी समितीने मंजूर केला आहे.

हा प्रस्ताव ठेवताना प्रशासनाने संबधित ठेकेदाराकडून रेडिरेकनर ऐवजी एसआरएच्या भाडे नियमावलीनुसार भाडेदराची आकारणी केली आहे. एसआरएच्या नियमावलीनुसार येथील एका गाळ्याचे भाडे दरमहा २२४२ रुपये इतके आहे. प्रशासनाने मुदतवाढ देताना घेतलेली भाडेदराची भुमिका आणि २०११ ते २०१९ पर्यंत संबधित विकसकाकडून आकारलेला भाडेदर यामध्ये कमालीचा फरक आहे. महापालिकेच्या भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाच्यावतीने २०११ मध्ये विकसकाशी परस्पर करारनामा करून ११७० रुपये दराने हे गाळे भाडेतत्वावर दिले होते. तसेच मुदतवाढ देताना सर्व नियमांना हरताळ फासला होता. त्यामुळे नव्याने प्रस्ताव ठेवताना प्रशासनाने भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय आणि झोन क्र. ३ च्या उपायुक्त कार्यालयावर अनियमीततेचा ठपका ठेवला आहे.परंतू नव्याने मुदतवाढीचा प्रस्ताव ठेवताना महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे गांभीर्याने पाहीले नसल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात स्थानीक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी महापालिकेच्या वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.

महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाने विकसकासोबतच हवेली उपनिबंधक कार्यालयाकडे करार करताना सादर केलेली कागदपत्रही बोगस असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. विशेष असे की विकसकाला नव्याने तीन वर्षे मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव सादर करताना ट्रान्झीट कॅम्पमध्ये किती लोक वास्तव्याला आहेत, त्यापैकी एसआरए योजनेमुळे तात्पुरते स्थलांतरीत करण्यात आलेले किती नागरिक आहेत? या ठिकाणी इतर ठिकाणच्या नागरिकांना गाळे परस्पर भाड्याने दिले असून काही मंडळी परस्पर भाडे लाटत आहेत, याबाबतही आलेल्या तक्रारींची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी यापुर्वीच याप्रकरणी चौकशी करून महापालिकेचे झालेले आर्थिक नुकसान संबधितांनाकडून वसुल करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मालमत्ता विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी इनामके मळा एसआरए ट्रान्झीट कॅम्पबाबत तक्रारी आल्या आहेत. या सदनिका विकसकाला भाडयाने द्याव्यात, असे एसआरए प्राधीकरणाकडून पत्र आल्यानंतर भाडेकराराला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. नवीन प्रस्ताव एसआरएच्या भाडेदरानुसारच २२४२ रुपये इतका आकारण्यात आला आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार याप्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. येत्या एक दोन दिवसांत अधिकार्‍यांचे पथक ट्रान्झीट कॅम्पच्या पाहाणीसाठी जाणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?