Pune News | सहकारनगरमध्ये इमारतींच्या पुनर्विकासाला गती; ‘सलील’ गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमीपूजन

पुणे : Pune News | सहा दशकापासून विस्तारलेल्या सहकारनगर (Sahakarnagar, Pune) मधील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाचे वारे वाहू लागले असून रविवारी चिंतामणी नगर Chintamani Nagar (तुळशीबागवाले कॉलनी Tulshibaugwale Colony) मधील ‘सलील’ गृहनिर्माण संस्था (‘Salil’ Housing Society) या पुनर्विकसित प्रकल्पाचे भूमीपूजन झाले. ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरूणा ढेरे (Senior poet Dr. Aruna Dhere) , रांजणगाव महागणपती देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र देव (Rajendra Dev) हे सहकारनगर चे रहिवासी या नात्याने उपस्थित होते.

‘गंगोत्री होम्स अँड हॉलिडेज’चे संचालक गणेश जाधव (Ganesh Jadhav, Director, Gangotri Homes and Holidays), मकरंद केळकर, राजेंद्र आवटे , ‘सलील’ सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष विनय मुंडी (Vinay Mundi, President, Salil Co-operative Housing Society) , सचिव प्रकाश कपिलेश्वर आदी उपस्थित होते.

बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करताना सत्शीलता आणि सचोटी जपणारे व्यावसायिक दुर्मीळ असून ‘गंगोत्री होम्स् अ‍ॅण्ड हॉलिडेज् ‘ ने ती जपली आहे. सहकारनगरमधील या पुनर्विकास प्रकल्पाच्या निमित्ताने सर्वांचे आशीर्वाद पुनर्विकासाला लाभोत, ‘ अशा सदिच्छा डॉ. ढेरे (Senior poet Dr. Aruna Dhere) यांनी व्यक्त केल्या. राजेंद्र देव यांनीही मनोगत व्यक्त केले.

१९७१ साली स्थापन झालेल्या या गृहनिर्माण संस्थेने टेंडर प्रक्रियेद्वारे पुनर्विकास प्रकल्पासाठी ‘
गंगोत्री होम्स अँड हॉलिडेज ‘ या विकसकाची निवड केली.आणी रविवारी सकाळी भूमीपूजन पार
पडले. या प्रकल्पाच्या नियोजित इमारती मध्ये 3 आणि 4 बीएचके च्या 21सदनिका असणार आहेत.
यावेळी गंगोत्री होम्सच्या संचालकांचा सत्कार करण्यात आला. गणेश जाधव यांनी प्रास्ताविक केले.
राजेंद्र आवटे यांनी आभार मानले.

पुनर्विकासाच्या वाटेवर सहकारनगर

१९६० च्या दशकात पानशेत पुरानंतर सहकारनगरकडे पुणेकरांची पावले वळाली, त्याला ६ दशकांचा कालावधी लोटला. टेकड्यांचा शेजार, हिरवाई मुळे प्रसिद्ध पावलेल्या या शांत परिसरातील या वसाहतींना आता पुनर्विकासाचे वेध लागले आहेत.

का होतोय पुनर्विकास?

कुटुंबातील सदस्यांची वाढलेली संख्या, अपुरी पडणारी जागा, जुनी झालेली इमारत, अपुरी पार्किंग व्यवस्था, लिफ्ट नसल्याने होणारी गैरसोय, आधुनिक सुखसोयींची गरज ही पुनर्वीकासाची कारणे आहेत.

हे देखील वाचा

Electricity Amendment Bill | खुशखबर ! आता मोबाइल पोर्टेबिलिटीप्रमाणे बदलू शकता वीज कनेक्शन; कॅबिनेटमध्ये इलेक्ट्रिसिटी (अमेंडमेंट) बिल- 2021 लवकरच

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune News | Accelerate redevelopment of buildings in Sahakarnagar; Bhumipujan of Salil Housing Society Redevelopment Project

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update