Pune News | आरोग्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार प्रस्ताव, आता तरी पुणेकरांना न्याय मिळेल का?, महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्याचा लेव्हल तीनमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहरात (Pune News) कोरोना रुग्णांची संख्या कमी असताना देखील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. यावर महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांनी नाराजी व्यक्त करत पुण्यातील निर्बंध शिथिल (Restrictions relaxed) करण्याची मागणी केली होती. शहरातील निर्बंध कमी करायचे असतील तर महापालिकेने प्रस्ताव द्यावा असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितले होते. आरोग्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार प्रस्ताव सादर केला आहे, आता तरी पुणेकरांना (Pune News) न्याय मिळेल का? असा सवाल महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे.

पुण्यातील कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट (Positivity rate) गेल्या तीन आठवड्यांपासून साडेतीन टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर पुण्यातील निर्बंध शिथिल होऊ शकतात. मात्र, त्याबाबत महापालिकेने प्रस्ताव पाठवणे गरजेचे आहे. त्यानुसार शहरातील निर्बंधांमध्ये शिथिलतेची मागणी करणारा प्रस्ताव महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सादर केला आहे. तो प्रस्ताव देताना गेल्या तीन आठवड्यातील बाधितांची आकडेवारीही जोडण्यात आली असून, त्यामध्ये बाधित दर चार टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे दिसून येत आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करुन म्हटले की, पुणे शहरातील निर्बंधामध्ये शिथिलता मिळावी, यासाठीचा प्रस्ताव आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठवला असून यावर तातडीने निर्णय घ्यावा. आधी पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा, आता आरोग्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार प्रस्ताव ! आता तरी पुणेकरांना न्याय मिळेल का? असा सवाल महापौरांनी राज्य सरकारला (State Government) विचारला आहे.

Web Title :- Pune News | According to the Health Minister, the proposal, will Punekar get justice now ?, Mayor Murlidhar Mohol’s question

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corona Restrictions | पुणे व्यापारी महासंघाचा इशारा, अजित पवारांनी निर्णय घ्यावा अन्यथा सोमवारपासून…

PM Mandhan Yojana | केवळ 55 रुपयांची बचत केल्यानंतर मोदी सरकार दरमहिना देईल 3000 रुपये, जाणून घ्या

Pune Corporation | शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पालिका प्रशासन लागले कामाला