Pune News : कोंढव्यात अनधिकृत बांधकामावर पुन्हा एकदा कारवाईचा फास; PMRDA, पिंपरी चिंचवड मनपाप्रमाणे कारवाईची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन ( बासित शेख ) –  कोंढव्यातील बेकादेशीर बांधकामाबाबत नागरिकांकडून तसेच लोकप्रतिनिधींकडून आरडाओरडा सुरु झाल्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाने आज मोठा लवाजमा आणून बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई केली. त्यासाठी अतिक्रमण विभाग व स्थानिक पोलीस ठाण्यांचा बंदोबस्त होता. मात्र, इतक्या मोठ्या बंदोबस्तानंतरही कारवाई झाली तरी केवळ तोंड देखलीच. बेकायदेशीर बांधकामांच्या भिंतींना काही ठिकाणी भोके पाडण्यात आली तर काही बांधकामावरील छतावरील स्लॅबवर थोडी तोडफोड करुन कारवाई केल्याचा भास निर्माण करुन पालिकेचे हे पथक पुन्हा निघून गेले.

कोंढव्यातील प्रभाग क्रं.२७ नुराणी कब्रस्तान समोरीले बांधकाम व्यावसायिक समर सैय्यद असीम शेख, दानिश कुडीया यांचे सर्वह नं. ४६ मधील बांधकामावर कारवाई केली गेली. सर्वह नं. १५ येथील इमामनगर येथेही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी महापालिकेचे बांधकाम अभियंता कैलास कराळे, कार्यकारी अभियंता नामदेव गंभीरे, कोल्हे,अहिरे, आदि उपस्थित होते. अतिक्रमण विभागाचे १ पोलीस उपनिरीक्षक १० पोलीस कर्मचारी आणि कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोनवणे, निंबाळकर व १० कर्मचारी असा बंदोबस्त होता.

construction-1

पिंपरी चिंचवड महापालिकेने बेकायदेशीर बांधकाम करणार्यांवर कारवाई कारवाई करुन त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पुणे महापालिका बेकायदेशीर बांधकामांवर जुजबी कारवाई करते. काही दिवसात बांधकाम व्यावसायिक महापालिकेने पाडलेला भाग पुन्हा दुरुस्त करता व तेथे कधी काही कारवाई केली होती, याची नामोनिशाणीही शिल्लक रहात नाही.

construction-2

पुणे शहराच्या हद्दीच्या लगतचे क्षेत्र पीएमआरडीएच्या कक्षेत येते. या ठिकाणी होणार्या बेकायदेशीर बांधकामांवर अत्यंत कठोरपणे कारवाई केली जाते. संपूर्ण इमारतीच्या पायापासून सर्व कॉलम तोडून टाकले जाते. जेणे करुन पुन्हा बांधकाम उभे करणे बिल्डरला अवघड होते, अशी कारवाई पुणे महापालिका कधी करणार आणि पिपंरी चिंचवड महापालिकेप्रमाणे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.