Pune News : मुक्या प्राण्यावर हल्ला करण्याचा शोध घेऊन कारवाई करावी – नीना राय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिकेने 11 ते 6 दरम्यान संचारबंदी असूनही अज्ञातांनी कुत्र्याला लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. ही घटना सोमवारी (दि. 25) घडली. जखमी कुत्र्यावर कोंढवा येथील कुत्र्याच्या दवाखान्यात उपचार सुरू आहेत. मुक्या प्राण्यावर हल्ला करणाऱ्याचा तपास करून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी परफेक्ट ॲनिमल वेल्पेअर सोसायटीच्या अध्यक्षा नीना राय यांनी केली आहे.

याप्रकरणी परफेक्ट ॲनिमल वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा नीना नरेश राय (वय 56, रा. स.नं.37-38, हिमाली सोसायटी, म्हात्रे पुलाजवळ, एरंडवणे, पुणे) यांनी फिर्याद दिली.

राय यांनी सांगितले की, गुरुवारी (दि. 25 फेब्रुवारी) सायंकाळी 6.30 च्या सुमारास मिशन पॉसिबल फाउंडेशन एनजीओच्या सदस्या पद्मिनी पिटर यांनी गुरुनानकनगरमध्ये कुत्रा जखमी अवस्थेत काही मुले घेऊन आली आहेत. कुत्र्याच्या डोक्यावर पाठीवर आणि कमरेवर जखमा असून, त्यातून रक्तस्राव होत आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून मी तातडीने तेथे पोहोचले आणि प्रथमोपचार करून कोंढवा येथे एक्स-रे काढण्यासाठी हलविले. उपचार सुरू केले आणि कुत्रा आणणाऱ्या मुलांकडे मुलांनी सांगितले चाचा हलवाई चौक, नाना पेठ येथून कुत्र्याला जखमी अवस्थेत आम्ही आणले. त्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी तेथील दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पहाटे दोनच्या सुमारास 25-30 वयोगटातील अज्ञातांनी लोखंडी रॉ़डने कुत्र्याला मारहाण केल्याचे निदर्शनास आले.

पालिकेने रात्री 11 ते 6 दरम्यान संचारबंदी केली असताना दोन अज्ञातांनी क्रूरपणे कुत्र्याला मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपींना कठोर शासन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास समर्थ पोलीस स्टेशन करीत आहे.