Pune News | पत्रकारितेच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेतर्फे (Garware Business Education and Development Institute) 2022-23 या शैक्षणिक वर्षाच्या पत्रकारितेच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी (Postgraduate Diploma Course in Journalism) प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन चौकशी फॉर्म संस्थेच्या www.gicededu.co.in या संकेतस्थळावर Enquire Now या सदराखाली उपलब्ध करुन देण्यात (Pune News) आला आहे.

आपल्याला या कोर्सची  माहिती हवी असल्यास या लिंकवर पार्ट टाईम कोर्स (Part Time Course) या सदराखाली पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् मीडिया मॅनेजमेंट मराठी (PGDMM -MARATHI) या अभ्यासक्रमासाठी फॉर्म भरावा. या अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी शनिवार (दि.9) सकाळी अकरा वाजता ऑनलाईन सेशन आयोजित करण्यात आले आहे. (Pune News)

फॉर्म भरल्यानंतर या सेशनची लिंक आपल्याला गरवारे कडून पाठवण्यात येईल. या वर्गाची प्रवेश परीक्षा 23 जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी नम्रता कडू (वर्ग समन्वयक, पीजीडीएमएम) ७९७७४८९०७६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune News | Admission process for postgraduate diploma course in journalism started

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | जबरी चोरी व वाहन चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना बंडगार्डन पोलिसांकडून अटक, रिक्षासह आठ दुचाकी जप्त (Video)

 

Devendra Fadnavis | शिंदे यांना थांबवून फडणवीसांच्या सभागृहातील भाषणावर शिवसेनेची टीका, देवेंद्र फडणवीस म्हणाले…

 

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं ’राज’कारण; म्हणाले – ‘त्याग करावा लागतो, त्याशिवाय आपलं…’