Pune News : अद्वैत क्रिडा केंद्रातर्फे जेष्ठ क्रिडापट्टूंचा चा युवा योद्धा पुरस्कार देऊन सम्मान

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar ) यांनी क्रिडा क्षेत्राच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे महाराष्ट्र व भारतात चांगले क्रीडापटू निर्माण होऊन त्यांनी देशाचे नाव उज्ज्वल करावे अशी अपेक्षा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव श्री बाळासाहेब लांडगे (Mr. Balasaheb Landage) यांनी एका कार्यक्रमात आपल्या भाषणात व्यक्त केली. तसेच सर्व पक्षांनी एकत्र येऊन श्री शरद पवार (NCP President Sharad Pawar ) यांना राष्ट्रपती करावे अशीही इच्छा श्री लांडगे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. नवी पेठेत लोकमान्य नगर येथे अद्वैत क्रिडा केंद्रातर्फे शरद पवार (NCP President Sharad Pawar ) यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ क्रीडापटू चा 80 वर्षाचा युवा योद्धा पुरस्कार देऊन सन्मान केला श्री बाळासाहेब लांडगे (Mr. Balasaheb Landage) यांच्या हस्ते प्रसिध्द रणजी पट्टू अनिल वाल्हेकर, आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच श्री विलास कथुरे, मॅरेथॉन आंतरराष्ट्रीय पंच श्री मधू देसाई, महाराष्ट्रातील कुस्ती चे पंच श्री संभाजी आप्पा शिंदे, आंतरराष्ट्रीय पंच श्री हरिशचंद थोरात, क्रिडा मार्गदर्शक पोलिस निरीक्षक श्रीमती प्रतिभा हरिभक्त, व सायकल फेडरेशन ऑफ इंडियाचे खजिनदार श्री प्रताप जाधव या ज्येष्ठ क्रिडापट्टू चा 80 वर्षांचा युवा योद्धा पुरस्कार देऊन त्यांचा खास सन्मान करण्यात आला सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ, व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन अद्वैत क्रिडा केंद्राचे अध्यक्ष डॉ श्री मदन कोठुळे, व सचिव श्रो युवराज दिसले यांनी केले होते याप्रसंगी विरोधी पक्षनेत्या सौ दीपाली धुमाळ, माजी नगरसेवक बाबा धुमाळ, नितीन कदम उपस्थित होते डॉ श्री मदन कोठुळे यांनी प्रास्ताविक केले सौ रुपाली अवचरे यांनी सूत्रसंचालन तर संजय कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले श्री धनंजय मदने उद्धव पवार यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले तसेच श्री अनिल वाल्हेकर, श्री विलास कथुरे यांनी यावेळी त्यांच्या केलेल्या सन्मानाविषयी आभार मानणारे भाषण केले .

या कार्यक्रमात बोलतांना श्री लांडगे म्हणाले की ज्येष्ठ खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात गेल्या अनेक वर्षात भरीव कामगिरी केली आहे देशाचे नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचा हा आदर्श घेऊन नवोदित व युवा खेळाडू नी देशाच्या क्रिडाक्षेत्राची परंपरा उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करावेत.