Pune News | मित्रांसोबत धुलिवंदन खेळून रंग धुण्यासाठी नदीवर गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू, मावळातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पुणे जिल्ह्यात धुलिवंदनाचा सण (Dhulivandan Festival) उत्साहात साजरा केला जात असताना मावळात दुर्दैवी घटना घडली आहे. मित्रांसोबत धुलिवंदन खेळून रंग धुण्यासाठी इंद्रायणी नदीवर (Indrayani River) गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू (Student Drowned) झाला. या घटनेमुळे (Pune News) हळहळ व्यक्त होत आहे. जयदीप पुरुषोत्तम पाटील Jaideep Purushottam Patil (वय-21 रा. तारखेडा, पाचोरा, जि. जळगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (दि.7) दुपारी वराळे येथे घडली.
जयदीप हा आंबी येथील डॉ. डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील (Dr. D.Y. Patil Engineering College Ambi) तिसऱ्या वर्षात शिकत होता. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास सात ते आठ विद्यार्थी रंग खेळले. त्यानंतर सर्वजण वराळे हद्दीतील इंद्रायणी नदीवर हातपाय धुण्यासाठी गेले. हातपाय धुवत असताना जयदीप याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. (Pune News)
याबाबत जयदीपच्या मित्रांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसांना (Talegaon MIDC Police Station) माहिती दिली.
त्यानंतर दोन तासांच्या शोधमोहिमेनंतर जयदीपचा मृतदेह (Dead Body) बाहेर काढण्यात आला.
बचाव पथकाने बोटीच्या साहाय्याने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune News | after holi celebration engineering collage student drowned in indrayani river dhulivandan
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update