×
Homeताज्या बातम्याPune News | कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आवारामधील पार्किंग शुल्क रद्द !

Pune News | कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आवारामधील पार्किंग शुल्क रद्द !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune News | गेले 6 ते 7 दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (krushi utpanna bazar samiti pune) आवारामध्ये वाहनशुल्क आकारण्यास (parking charges ) सुरुवात झाली. त्याचा अतिरिक्त आर्थिक भार हा खरेदीदार व इतर घटकांवर पडत होता. त्यामुळे बाजाराकडे खरेदीदाराने पाठ फिरवली. पर्यायाने शेतकऱ्यांचा शेतीमाल न विकला गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे यास कामगार संघटना, टेम्पो संघटना,आडते असोसिएशन, खरेदीदार यांनी विरोध केला होता व रविवार पासुन त्याकरिता संप पुकारण्यात आला (Pune News) होता.

 

त्यासंदर्भात बाजार समितीत आज वार बुधवार सकाळी १२ वाजता बैठक पार पडली. सुरू केलेले पार्किंग शुल्क बाजार समितीने रद्द केल्याचे आज जाहीर केले.
चर्चेअंती नाममात्र प्रवेश शुल्क घेण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.
उद्या सकाळी 8.00 वाजता गणपती मंदिर येथे खरेदीदार आणि टेम्पो चालक यांची बैठक होईल व सदर बैठकीमध्ये किती प्रवेशशुल्क द्यायचा हे ठरेल.
आणि त्या प्रकारचा तसा प्रस्ताव बाजार समितीला देण्यात येईल.
असे यावेळी टेम्पो संघटना व कामगार युनियन च्या वतीने संतोष नांगरे (Santosh Nangare) यांनी सांगितले.

 

सदर बैठकीस बाजार समितीचे प्रशासक मधुकांतजी गरड व अधिकारी यांच्या समवेत आडते असो.अध्यक्ष विलास भुजबळ,
अमोल घुले, राजेंद्र कोरपे, टेम्पो संघटनेचे राजेंद्र रेणूसे, कामगार संघटनेचे विशाल केकाणे आदी (Pune News) उपस्थित होते.

 

Web Title : Pune News | Agricultural Produce Market Committee cancels parking charges in the yard!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Paduka Darshan ceremony | लहू बालवडकर सोशल वेलफेअरच्या पुढाकारानं भारतातील 12 शक्तिपीठांच्या पादुका दर्शनाचा सोहळा

Syed Mushtaq Ali Trophy | राहुल द्रविडच्या ‘या’ शिष्याचे धमाक्यात कमबॅक !

PM Kisan | खुशखबर ! शेतकर्‍यांना 10 व्या हप्त्यात 4000 रुपयांसह मिळतील 3 आणखी फायदे, जाणून घ्या कसे 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News