Pune News | मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

पुणे : Pune News | लोकशाहीमध्ये मतदारांचा सहभाग महत्वाचा असल्याने निवडणूक आयोगाने सर्वसमावेशक निवडणूक प्रक्रियेवर भर दिला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.(Pune News)

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित समन्वयक अधिकारी यांच्या कामकाज आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पुणे शहर अपर पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पिंपरी-चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, अतिरिक्त विभागीय आयुक्त अण्णासाहेब चव्हाण, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, उपायुक्त रामचंद्र शिंदे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, स्वीप समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे आदी उपस्थित होते.(Pune News)

श्री. देशपांडे म्हणाले, निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी दिव्यांग, महिला, युवक, तृतीयपंथी, ज्येष्ठ नागरिक, कामगार, कलावंत, साहित्यिक, नाटककार आदी सर्वांनाच मतदार नोंदणी करण्यासोबतच मतदान करण्याविषयी प्रात्सोहित करावे. महाविद्यालयासोबत बैठक घेऊन सर्व नवमतदारांच्या नोंदणीसाठी आवाहन करावे. महाविद्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या पालक सभेत मतदानाविषयी जनजागृती करावी.

सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान होईल, मतदानाच्यावेळी मतदान केंद्रांची माहिती होण्यासाठी मतदान माहिती पत्रिकेचे वितरण होईल, याची दक्षता घ्यावी. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार संघामध्ये दिव्यांग, महिला, एकमेवाद्वित्तीय अशी आदर्श मतदान केंद्रे स्थापन करण्याबाबत कार्यवाही करावी.

अतिसंवेदनशील आणि संवेदनशील मतदान केंद्राला पोलीस विभागासोबत भेटीचे आयोजन करुन आवश्यक त्या सर्व सुरक्षेच्या आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थांना मतदार नोंदणीप्रसंगी प्रशासनाच्यावतीने आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवाव्यात. महिला मतदारांची नोंदणी करुन मतदान जनजागृतीपर मेळावे आयोजित करण्यासोबतच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत करावेत.

मतदार यादीच्या माहितीचे (डाटा) दर आठवड्याला अवलोकन करावे. मतदार नोंदणीच्या अनुषंगाने प्राप्त सर्व अर्ज विहीत मुदतीत निकाली काढावे तसेच प्राप्त तक्रारीची गांभीर्याने दखल घेत निराकरण करावे. मतदार यादीचे शुद्धीकरण करण्यासाठी यासाठी त्यातील त्रुटीची पूर्तता करावी. या बाबी करताना राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन कार्यवाही करा, असे निर्देश त्यांनी दिले.

समन्वयक अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची

सार्वत्रिक निवडणुकीच्यादरम्यान समन्वयक अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची असून त्यांना निवडणुकीबाबत सर्व टप्प्यांची माहिती असणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीबाबत मागितलेली माहिती वेळेत पाठविण्याची कार्यवाही करावी. त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी.

ईव्हीएम यंत्राच्या सुरक्षितेच्यादृष्टीने आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपायोजना कराव्यात.
निवडणुकीच्यावेळी माध्यमात येणाऱ्या नकारात्मक वृत्ताच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी
त्याबाबत वस्तुनिष्ठ माहिती दिली पाहिजे, असेही श्री. देशपांडे म्हणाले.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याच्यादृष्टीने व्यापक जनजागृती मोहीम राबवावी.
त्यामध्ये विविध सकारात्मक वृत्त विविध माध्यमाद्वारे प्रसारित करण्यात यावे. त्यामाध्यमातून मतदार प्रोत्साहित
होऊन मतदानाच्या टक्केवारी वाढ होण्यास मदत होईल. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत,
असेही डॉ. पुलकंडवार म्हणाले.

अमितेश कुमार म्हणाले, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीसांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात येत आहे.
अतिसंवेदनशील आणि संवेदनशील मतदान केंद्राच्या अनुषंगाने परिसराला भेटी देण्यात येत असून त्यानुसार
प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. पोलीस दलाच्या टपाली मतदानासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया
करण्यात येईल, असेही श्री. कुमार म्हणाले.

डॉ. दिवसे म्हणाले, निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणाचे प्रशिक्षण घेण्यात येत असून येत्या काळात पोलीस दलाचेही प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.
दुर्गम (शॅडो) भागातील मतदान केंद्रांवरील संपर्क व्यवस्थेच्या अनुषंगाने सर्व संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.
मतदार नोंदणी व मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी म्हणून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
शैक्षणिक संस्था, औद्योगिक आस्थापना, महिला बचत गट, सामाजिक संस्था आदी सर्व संबंधित घटकांसोबत बैठक
घेऊन मतदान जनजागृती करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

बैठकीला जिल्ह्यातील समन्वयक अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सर्व मतदार संघांचे सहायक निवडणूक अधिकारी आणि मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मतदार नोंदणी, मतदान केंद्रांची व्यवस्था, मतदार जनजागृती, मतदारांसाठी असलेल्या सुविधा, मतदान प्रक्रिया,
शॅडो मतदान केंद्रे, टपाली मतपत्रिका, सुरक्षा व्यवस्था, ईव्हीएम, माध्यमे, निवडणुकीच्यावेळी उद्भवणाऱ्या संभाव्य
घटना आदी बाबींचा आढावा घेण्यात आला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Sunil Kamble | अखेर पोलिसांच्या अर्जित रजेचा शासन निर्णय रद्द, आमदार सुनील कांबळेकडून निर्णयाचे स्वागत

Pune Cheating Fraud Case | मोठा परतावा देण्याच्या आमिषाने 13 जणांची 17 कोटींची फसवणूक, बिबवेवाडी परिसरातील प्रकार