Pune News | पुण्याच्या चारही धरणात पुणेकरांना वर्षभर पुरेल एवढं पाणी जमा

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune News | राज्यात कोरोननांतर आता पावसाने जाम वेडा दिला आहे. अनेक पूरपट्ट्यातील भागात पाणी वाढत आहे. पावसाचे प्रचंड प्रमाण कोकण भागात तसेच, पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) देखील पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. मात्र यामुळे, खडकवासला (khadakwasla) धरणात आज (बुधवारी) सकाळी या चारही दरामध्ये मिळून 24.25 TMC अर्थात 83.21 टक्के पाणी साठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा शहर (Pune News ) आणि परिसराला पिण्यासाठी वर्षभर पुरेल एवढा अथवा शेतीकरीता वर्षभर पुरेल इतका पाण्याचा साठा झालं आहे.

मागील आठवड्यात राज्यात मुसळधार पावसाने धो धो केला आहे. कोकणात तसेच, पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरदार थैमान घातलं आहे. मग आपल्या खडकवासला धरण साखळीत देखील पाऊस झाला. खडकवासला (Khadakwasla) धरणातून पाणी सोडले जातेय. तसेच, आज दिवस शेट्कती पाणीसाठा जमा झाला आहे. आणि तो किती दिवस पुरेल, असा प्रश्न पडला असेल, त्याचे उत्तर असे आहे, बुधवारी सकाळी या चारही दरात मिळून 24.25 TMC 83.21 टक्के पाणी साठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा शहर आणि परिसराला पिण्यासाठी वर्षभर पुरेल एवढा किंवा शेतीसाठी वर्षभर पुरेल एवढा जमा झाला आहे.

जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, पुणे शहर आणि परिसराला वर्षभर पिण्यासाठी 21 टीएमसी पाण्याची गरज असते. आणि शेतीचा विचार केला तर शेतीसाठी कालव्यामधून खरीप एक, रब्बीचे दोन व उन्हाळी 2 अशी 5 आवर्तन सोडावी लागतात. किमान 1 आवर्तन 4 TMC एवढा असते. अर्थात सध्या जमा झालेला 24.25 TMC पाणीसाठा पिण्यासाठी अथवा शेतीसाठी वर्षभर पुरेल एवढा जमा झालेला आहे. दरम्यान, गुरुवारपासून खडकवासला धरणातून मुठा नदीत सुमारे 3.15 TMC पाणी या धरणातून सोडण्यात आले आहे. बुधवारी खडकवासला धरणातून 3 हजार 424 क्युसेकचा विसर्ग मुठा नदीत सोडला जात आहे. बुधवारी सकाळी 6 वाजेपर्यंत खडकवासला येथे 6, पानशेत 34 , वरसगाव येथे 38 तर टेमघरला 70 मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्या पंधरा दिवसात पडल्याची नोंद झाली आहे. मागील पंधरा दिवसापासून धरणातून जवळजवळ एक हजार क्युसेकचा विसर्ग सुरु आहे.

मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता 4 ही धरणातील पाणी साठ्याची स्थिती :

खडकवासला- 1.97 / 1.697/ 100

टेमघर- 3.71/2.51 / 6781

वरसगाव- १२.८२ / १०.२० / ७९.५७

पानशेत- 10.65 / 9.57 / 89.84 १०.६५ / ९.५७ / ८९.८४

4 धरणात एकूण पाणीसाठा एकूण : 29.95 / 24.25 / 83.29

Web Title : Pune News | all the four dams collect enough water to supply pune throughout the year

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Google द्वारे तुम्ही दरमहा घरबसल्या कमावू शकता 50 हजार रुपये, जाणून घ्या काय करावे?

Accident News | काळाचा घाला ! तीन आठवड्यातच मोडला संसार; नवोदित अभिनेत्रीचा अपघातात जागीच मृत्यू

Pune News | पुण्यात PMPML बसच्या दरवाजातून पडून महिलेचा मृत्यू; चार महिन्यांनी पोलिसांकडून घटनेची ‘उकल’