Pune News | युवराज ढमालेंसह भागीदारांकडून महापालिका व रहिवाशांची फसवणूक झाल्याचा आरोप; मात्र रहिवाशांनी कुठल्याही फसवणूक झाली नसल्याचे सांगितले

पुणे – Pune News | कोंढवा येथील (Kondhwa News) राजगृही बिझनेस हब (Rajgruhi Business Hub In Kondhwa) कमर्शियल प्रिमायसेस सहकारी संस्थेची इमारत युवराज ढमाले (Yuvraj Dhamale), विकी संघवी व इतर विकासकांनी बांधली आहे. येथील रहिवाशांना फ्लॅट दिला मात्र पार्किंग चा रॅम्प नसल्याने त्यांना पार्किंग वापरता येत नाही. तसेच पार्किंगच्या जागेत बेकायदेशिरपणे जिम व हॉटेलचा व्यवसाय सुरू केल्याचा आरोप आहे. त्यामुळे महापालिकेने Pune Municipal Corporation (PMC) या बेकायदेशीर कामावर व महापालिकेची फसवणूक करणाऱ्या या विकासकांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तुषार पाटील (Tushar Patil), माजी नगरसेवक शंकर पवार Shankar Pawar), राहुल भंडारे (Rahul Bhandare), पिंटू धाडवे (Pintu Dhadve) यांनी केली आहे. (Pune News)

येथील बेकायदेशीर बांधकामाचा आणि हॉटेल व्यवसायाचा राजगृही सोसायटी मधील रहिवाशांना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. रविलाल प्रजापती यांनी या अगोदर याप्रकरणी तक्रार अर्ज देखील दिला होता. मात्र, महापालिकेने अद्याप त्यावर कारवाई केली नाही. (Pune News)

राजगृही बिझनेस हब कमर्शियल प्रिमायसेस सहकारी संस्थेच्या इमारतीच्या समोर बांधलेल्या
कमर्शियल इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर चारचाकी पार्किंगच्या जागेवर बेकायदेशीरपणे जिम सुरू केली आहे. तर, पाचव्या मजल्यावर दुचाकी पार्किंग असताना त्याजागी हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे.

कोंढवा बुद्रुक (Kondhwa Budhruk) येथील सर्व्हे नंबर 62/1/2/1 आणि 62/1/2/2 या जागेत हा
राजगृही प्रकल्प आहे. या प्रकल्पावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी. तेथील स्थानिक रहिवाशांना या
बेकायदेशीर कामामुळे होत असलेला त्रास लक्षात घेता ताबडतोब कारवाई होणे आवश्यक आहे.
येत्या 2 ते 3 दिवसात कारवाई झाली नाही तर, आम्ही कायदेशीर मार्गाने आंदोलन करू, असा इशाराही तुषार पाटील,
शंकर पवार, राहुल भंडारे व पिंटू धाडवे यांनी दिला आहे.

 

दरम्यान, याबाबत सोसायटीमधील रहिवाशांनी त्यांची कुठल्याही प्रकारची फसवणूक झाली नसल्याचे सांगितले
आहे. सोसायटीचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये असं सोसायटीनं पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

 

Web Title :-  Pune News | Allegations of defrauding the municipality (Pune PMC) and residents by partners including Yuvraj Dhamale; Demand action on illegal construction, warning of agitation if no action is taken

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Siddharth Shirole | 23 गावांच्या विकासासाठी महापालिकेकडे नियोजन सोपवावे – आमदार सिद्धार्थ शिरोळे

Mahavikas Aghadi On Shinde-Fadnavis | या सरकारचा उपयोग काय, गरीबांच्या घरी जेवण नाय… !महाविकास आघाडीच्या आमदारांनी चूल रचून गॅस दरवाढीचा केला निषेध

Nana Patole Taunt To Ajit Pawar | नाना पटोलेंचा अजित पवारांना टोला; म्हणाले – ‘माझं नाव नाना आहे, दादा नाही त्यामुळे…’

Sanjay Mayekar Pune | संजय मयेकर यांची भाजप प्रदेश प्रवक्ते पदी नियुक्ती

Lok Sabha Elections 2024 | लोकसभा निवडणुकीसाठी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? जाणून घ्या ठाकरे गट, राष्ट्रवादी व काँग्रेसला जागा किती