Pune News | खा. उदयनराजेंविषयी अपशब्‍द वापरणाऱ्या उद्योजकाच्या तोंडाला काळे फासले; शिवधर्म फाऊंडेशनच्या 7 जणांना अटक

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News |खासदार उदयनराजे भोसले (MP Udayan Raje Bhosale) यांच्याविषयी अपशब्‍द वापरल्‍याप्रकरणी शिवधर्म फाऊंडेशनच्या ( Shivdharma Foundation ) कार्यकर्त्यांनी लोणी देवकर (ता. इंदापूर, जि. पुणे ) औद्योगिक वसाहातीमधील उद्योजक अशोक संवरलाल जिंदाल यांच्या तोंडाला काळे फासले आहे. गुरुवारी (दि. 24) ही घटना घडली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जिंदाल यांच्या तोंडाला काळे फासून कार्यकत्यांनी त्यांना इंदापूर पोलिस (Indapur Police) ठाण्यात हजर केले. इंदापूर पोलिसांनी या प्रकरणातील 7 जणांना अटक केली आहे. दरम्यान जिंदाला यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

या प्रकरणी शिवधर्म फाउंडेशनचे प्रमुख दिपक उर्फ अण्णा सिताराम काटे (वय 28, रा. सरस्वत नगर, इंदापूर), अमोल अंकुश पवार (वय 25) कुणाल शिवाजी चव्हाण (वय 33) प्रदीप चंद्रकांत भोसले (वय 24) ,सुनील विठ्ठल रायकर (वय 23, चौघेही रा. अकलूज), किरण रवींद्र साळुंखे (वय 27 वर्षे रा. भवानीनगर),अक्षय चंद्रकांत चव्हाण (वय 25 वर्ष, भिगवण रोड, बारामती) यांना अटक केली असून अन्य 4 ते 5 जणांवर इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लोणी देवकर येथील एमआयडीसीच्या चौकात भगवे झेंडे घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांनी 2 आलिशान गाडीतून उतरून जिंदाल यांच्या तोंडाला काळे फासले.
जिंदाल यांना पोलिस ठाण्यात घेवून आल्‍यानंतर कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचे सिलेंडर लपवून ठेवल्‍याचा आरोप केला.
या उद्योजकाने बेताल वक्तव्य केले आहे.
त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. बेकायदेशीर जमाव जमवल्या प्रकरणी तसेच जिल्‍हाधिकाऱ्यांच्या जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्‍याप्रकरणी,
शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : pune news | an industrialist who used abusive words about chhatrapati udayan raje bhosale was beaten up, police arrest seven

 

हे देखील वाचा

Pune News | पुण्यातील आढावा बैठक अजित पवारांच्या अनुपस्थितीत; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

Pune Crime Branch Police | वाहन चोर्‍या करणार्‍या सराईताला गुन्हे शाखेकडून अटक, स्वतःच्या सोसायटीच्या पार्किंगमधूनही…

Sanjay Raut । भाजपाच्या कार्यकारिणीत अजित पवारांसंबंधी झालेल्या ‘त्या’ ठरावावरुन संजय राऊत भडकले, म्हणाले..