Pune News : पुण्यात आतापर्यंत तब्बल 1530 पोलिस ‘कोरोना’बाधित, 42 ‘अ‍ॅक्टीव्ह’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा संसर्ग शहरात झपाट्याने वाढत असून, यात पोलिस कर्मचाऱ्यांची बाधित होणारी संख्या देखील वाढू लागली आहे. 4 वरुन हा आकडा आता 42 वर जाऊन पोहचला आहे. दरम्यान, आतापर्यंत 1530 पोलिसांना करोनाचा संसर्ग झाला आहे.

सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ पुण्यात होत आहे. दररोज दीड हजार रुग्ण नवीन निघत आहेत. पुणेकरांची काळजी घेत 24 तास बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांची संख्या आता वाढू लागली आहे. आतापर्यंत 1530 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. 158 अधिकारी व 1372 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पोलिस कर्मचाऱ्यांचा आकडा 4पर्यंत खाली आला होता. पण वाढत्या रुग्ण संख्येत कोरोनाच्या पोलिसांची संख्याही वाढत आहे. शहर पोलीस दलात सध्या 42 पोलिस उपचार घेत आहेत. त्यात 9 अधिकारी व 33 कर्मचारी आहेत. 42 पैकी 16 पोलिस रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर, 26 जण डॉक्टरांच्या सल्ल्यांने घरी उपचार घेत आहेत. त्यामुळे पोलिसांना बंदोबस्त करताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यात पोलिसांना संसर्ग होत आहे. बाधित पोलिसांचा आकडा चारवर आला होता. तो आता 42 वर गेला असून, पोलिसांकडून अधिक खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनी देखील नियमांचे पालन करावे.

लसीकरण जोरात

पुणे पोलिस दलातील साडेसहा हजार पोलिसांनी करोनावरील लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर, ८४ पोलिसांनी दोन्ही डोस घेतले आहेत. सध्या पोलिसांचे लसीकर वेगात सुरू आहेत. लस घेतलेल्या काही पोलिसांना करोना झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्याबाबत अभ्यास केला जात आहे.