Pune News : सहाय्यक आयुक्त सतिश गोवेकर, गजानन टोंपे यांच्या अंतर्गत बदल्या, जाणून घ्या पोस्टींगचे नवीन ठिकाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आयुक्तालयातील फरासखाना विभागामध्ये एसीपी सतिश रघुवीर गोवेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर फरासखाना विभागातील सहाय्यक आयुक्त गजानन टोंपे यांची कोथरूड विभागात बदली करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्याबाबतचे आदेश आज (बुधवारी) काढले आहेत. गोवेकर हे यापुर्वी आयुक्तालयातील मानवी संशाधन विभागात कार्यरत होते.

कोथरूड विभागाचे सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र बाबुराव चव्हाण हे सध्या रूग्णनिवेदनामध्ये (सिक रिपोर्ट) आहेत. ते पुन्हा हजर झाल्यानंतर त्यांच्या पदस्थापनेबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत. दरम्यान, सहाय्यक पोलिस आयुक्त गोवेकर यांची फरासखाना विभागात तर टोंपे यांची कोथरूड विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.