Pune News : चौघांकडून सहाय्यक पोलिस निरीक्षकास मारहाण, जमावानं 2 लाईन बॉयला देखील केली बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  ट्रीपलसीट जाणाऱ्या दुचाकीस्वारावर कारवाई करताना चौघांनी मिळून सहायक पोलीस निरीक्षकाला मारहाण केली. तर त्या निरीक्षकाला सोडविण्यासाठी गेलेल्या दोन लाईन बॉयना देखील जमावाने बेदम मारहाण केली आहे. वानवडीत हा प्रकार घडला आहे.
मोसिन बागवान (वय २४), फैजल वहाब अन्सारी (वय २५), शकील अद्दल अन्सारी (वय २४), शहाबाद दिलशाद अलवी (वय २४ सर्व रा. हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सहायक निरीक्षक उमाजी राठोड यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड इतर कर्मचाऱ्यांसह सय्यदनगर रेल्वे परिसरात वाहतूक नियमन करीत होते. त्यावेळी दुचाकीवर ट्रीपल सीट प्रवास करणाऱ्या मोसिमनला त्यांनी अडविले. त्याचा राग आल्यामुळे त्याने राठोड यांना अपशब्द वापरून आरडा-ओरड केली. त्यानंतर त्यांना चौघांनी मिळून राठोड यांना हाताने मारहाण केली. यावेळी येथुन लाईन बॉय मंगेश रोकडे व सयाजी सूर्यवंशी हे थांबले. त्यांनी हे वाद सोडवले. त्यानंतर ते तेथून परत निघाले. यावेळी जमलेल्या जमावाने त्यांना अडवून तुम्ही का मध्ये आला असे म्हणत त्यांना मारहाण केली. अधिक तपास उपनिरीक्षक डोंबाळे करीत आहेत.