Pune News | अल्पवयीन मुलाला ऊसाच्या दांडक्याने केली मारहाण; पोटात रक्तस्त्राव झाल्याने मुलगा झाला अत्यवस्थ, खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (policenama online) – ऊस तोड कामगाराचा १३ वर्षाचा अल्पवयीन मुलगा शौचासाठी ऊसाच्या शेतात Farm गेला याचा राग अनावर होऊन एकाने या मुलाला ऊसाच्या दांडक्याने बेदम मारहाण केली. उचलून जमिनीवर आपटले, त्यामुळे मुलाच्या पोटात रक्तस्त्राव होऊन तो अत्यवस्थ झाला. याप्रकरणी यवत पोलिसांनी Yavat Police खुनाचा Murder प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. pune news attempt to murder case

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Chandrakant Patil । चंद्रकांतदादांचा राऊतांना टोला; म्हणाले – ‘शरद पवारांच्या पे रोलवर राहण्यापेक्षा शिवसैनिकांच्या व्यथा मांडा’

संदीप नारायण आखाडे असे गुन्हा Crime दाखल झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी दगडु कचरु बलय्या (वय ५०, रा. कासुर्डी गाव, मुळ बीड) यांनी यवत पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
ही घटना दौंड तालुक्यातील कासुर्डी गावच्या हद्दीत किरण आखाडे यांच्या शेतात सोमवारी सकाळी घडली.
दगडु बलय्या हे मुळचे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रामपुरी येथील राहणारे आहेत.
ते ऊस तोड कामगार Sugarcane workers म्हणून काम करतात. सध्या ते कासुर्डीगावात रहात आहेत.
त्यांचा १३ वर्षाचा मुलगा तेजस सकाळी शौचाला शेतातील ऊसाच्या पिकात गेला होता.
या कारणावरुन संदीप आखाडे याने चिडून जाऊन तेजस याला हाताने, लाथाबुक्क्यांनी व ऊसाच्या दांडक्याने पोटात, पाठीत, बरगडीवर मारहाण केली.
त्याला उचलून जमिनीवर आपटले. मुलाला सोडविण्यासाठी आलेल्या त्याच्या आईला जोरात ढकलून दिले. पुतण्याच्या पाठीत ऊसाचे दांडक्याने मारहाण केली.

तेजस याला मारहाण करुन गंभीर जखमी केले. त्याला अस्तवस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले. या मारहाणीमुळे त्याच्या पोटात रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले. पोटातील अवयव पलीहा स्प्लीन होऊन गंभीर दुखापत झाली आहे. यवत पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा संदीप आखाडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : pune news attempt to murder case

हे देखील वाचा

तुमच्या Aadhaar Card वर जेंडर चुकीचे आहे का? UIDAI ने जारी केली लिंक; आता घरबसल्या अपडेट करा ‘या’ सोप्या पध्दतीनं, जाणून घ्या

रश्मी शुक्ला यांच्यासह एका पोलिस अधीक्षकांवर गंभीर आरोप; पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी