Pune News । पुण्यातील महिला पोलिस उपायुक्तांच्या ‘त्या’ व्हायरल Audio Clip ची गृहमंत्र्यांकडून गंभीर दखल (ऑडिओ क्लीप)

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –   Pune News । पुणे पोलीस दलातील महिला अधिकारी (DCP) कर्मचाऱ्याला जेवणाची ऑर्डर देताना हॉटेलवाल्याला बिलाचे पैसे देण्याची गरज काय आहे? अशी विचारणा करताना दिसताहेत. याबाबत एक ऑडिओ क्लिप (Audio clip) प्रचंड व्हायरल होत आहे. या क्लिपमुळे पुणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या क्लिपबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी देखील दखल घेतली आहे. गृहमंत्री वळसे पाटील यांनी या ऑडिओ क्लिपबाबत पुण्याचे पोलीस आयुक्तांकडून (Police Commissioner) अहवाल मागवला (Pune News) आहे.

पुण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याचं (DCP) फोनवरील संभाषण चांगलंच व्हायरल होत आहे. पुण्यातील डीसीपी (DCP) मॅडमला एसपी हॉटेलची बिर्याणी हवी आहे, तीही मोफत. त्या महिला अधिकारी कर्मचाऱ्याला विश्रामबागच्या (Vishrambag) इथे नॉनव्हेज खूप चांगलं मिळतं असं ती म्हणत होती सांगत कुठे अशी विचारणा करतात. यावर पोलीस कर्मचारी SP बिर्याणीची साजूक तुपातली बिर्याणी, कोल्हापूरची मटण थाली असं आहे म्हणून म्हणतो. यावर महिला अधिकरी जास्त चांगली कुठे आहे असं विचारल्यानंतर कर्मचारी त्यांना साजूक तुपातली, त्यांच्याकडे 2-2 प्रकार आहेत. त्यात नल्ली निहारी म्हणून एक प्रकार आहे, ऑईली वैगेरे नाही आणि साजूक तुपातली पण चांगली आहे. कलर वगैरे नसतं त्यात असं तो कर्मचारी सांगतो. यावरून पुढे संभाषण काय होत ते बघा.

 

 

महिला पोलीस – बरं जी एक चांगली असेल ती पाठवून द्याल सोनावणेकडे. जर काय याचा इश्यू असेल तर पीआयला सांगून द्या मॅडमनं सांगितलं म्हणून. मी बोलू का पीआयला.
पोलीस कर्मचारी – नाही मॅडम करतो मी.
महिला पोलीस – त्याच्या हद्दीतलं आहे तर पैसे कशाला द्यायचे आपण, आपल्या हद्दीमध्ये पण पैसे द्यायचे का आपण?
पोलीस कर्मचारी – आपण यापूर्वी असं कधी केलं नव्हतं त्यांना..ठीक आहे मॅडम मी सांगतो..पीआयशी बोलतो आणि हे करून घेतो.
महिला पोलीस – मग तुम्ही काय करायचे?
पोलीस कर्मचारी – आपण कॅशच करायचो मॅडम.
महिला पोलीस – तेवढं करेल तो..त्यादिवशी मला बोलत होता एक हॉटेल आहे म्हणून…तेवढं करेल तो..त्याच्यात काय एवढं? नाहीतर दुसरं कोणी असेल..किंवा मी सांगते.
पोलीस कर्मचारी – येस मॅडम. मी सांगतो.
महिला पोलीस – त्यादिवशी मला बोलला तो..आम्ही तिथे फिरत होतोना तर मला बोलला..पण आपल्या हद्दीत आहे तर त्यासाठी का पैसे पे करायचे..आपल्या हद्दीतल्या गोष्टीसाठी कोणी पैसे पे करतं का?..मला माहीत नाही.

 

 

 

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतली दखल –

“याबाबत प्रकरणाची ऑडिओ क्लिप मी ऐकली आहे. हे प्रकरण गंभीर आहे.
त्यावर पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करण्यास सांगितला असून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
असं वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी पुण्यातील माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

 

Web Title : Pune News | audio clip of pune police woman officer ordering free biryani goes viral Serious attention from the Home Minister dilip walse patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | तक्रार दिल्याच्या रागातून महापालिका अभियंता व ठेकेदाराकडून मारहाण

Crime News | खळबळजनक ! महापौराची गोळ्या झाडून हत्या; भाजप आमदाराचं कनेक्शन?

Pune Corporation | विकास आराखड्याच्या भूमिकेवर महापौर मोहोळ ठाम ! समाविष्ट गावांचा विकास आराखडा महापालिकेकडेच द्या, महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी